दयाशंकर मिश्र : बाळाच्या जन्माच्या वेळेस या गोष्टीवर जास्त लक्ष दिलं जातं की, बाळ रडलं किंवा नाही. जर काही कारणाने जर बाळ रडलं नाही, तर डॉक्टर त्याला रडवण्याचा प्रयत्न करतात. कारण बाळाचा श्वास गर्भातील मुलाच्या गर्भनाळच्या माध्यमातून सुरळीत सुरू असतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र बाहेर आल्यानंतर बाळाला स्वत:ला श्वास घ्यावा लागतो. तो प्रयत्न बाळ करत असतं. डॉक्टर बाळाला यासाठी रडवतात की, त्याची फुफ्फसं सक्रिय व्हावीत, त्याच्या श्वासनलिकेचा रस्ता खुला व्हावा. या प्रमाणे अश्रू आपल्या जीवनाचे आधार होतात.


येथे रडणं किती वैज्ञानिक आहे, दु:खातून मुक्त होवून जीवनाच्या मार्गावर जाण्याची ही प्रक्रिया आहे. जस जसे आपण मोठे होत जातो, आपण सोप्या विज्ञानापासून दूर होत जातो. आपण दुसऱ्यांचे अश्रू पाहून, सुखी होवू लागतो. दुसऱ्यांच्या दु:ख ऐकण्यात आपण रमतो. आपल्याला कधी समजलं, कुणाच्या आयुष्यात असं घडतंय जे घडायला नको होतं, ते ऐकण्यात आपल्याला जास्त रस असतो.


आपला स्वभाव थोडासा हरिशंकर परसाई यांच्या 'निर्दोष' मिथ्यावादी सारखा होत जातो. ‘निर्दोष’ मिथ्‍यावादी असेच लोक असतात. जे कारण नसताना खोटं बोलतात. हळू हळू एकमेकांचं अनुकरण करणे. पुढे जावून यात त्यांना खूप मज्जा येते. यांना योग्य ठिकाणी खोटं बोलण्यात रस असतो. हा रस पुढे जाऊन आनंद होतो.


असंच आपण एकदा दु:खी झाल्यानंतर 'निर्दोष' दुखी होत जातो. म्हणजे कुणाचाही दोष नसताना. दररोजच्या लहान लहान गोष्टीत, आपण उगाच दु:खाचा शोध घेत असतो. शोध घेण्यात काय मिळणार नाही, यात दु:ख मिळणार नाही, याची शक्यता फार कमी आहे.


'निर्दोष' दु;खाचा एक आधुनिक किस्सा काल एका रेडिओ स्टेशनवर ऐकला. आरजेने सांगितलं की, संपूर्ण जगात युवा ज्या गोष्टींनी दु:खी आहे, चिंतीत आहे, त्यात एक हे देखील आहे की, त्यांचं ब्रेकअप होत नाहीय. आता युवक या गोष्टीच्या तणावात आहेत की, त्यांचं 'ब्रेकअप' होत नाहीय.


आता समजून घेऊ की दु:खी राहण्याचा निर्णय जास्तच जास्त वेळेस आपण स्वत: कसा घेतो.


एका मित्राला आयएएस करून मोठा सरकारी अधिकारी व्हायचं होतं. पण तो कधी होऊ शकला नाही. पण तो अजुनही त्याच धुंदीत असतो. त्याच्या वागणंबोलणं आता आयएएस ऑफिसर असल्यासारखंच असतं.


हा मित्र आता एका चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीत कार्यरत आहे. पण सुखी नाही. कोणत्याही गोष्टीत सिस्टममधील भ्रष्टाचार, भेदभाव यांच्यावर तो संताप करत असतो. जेव्हा की त्यांना ही त्यांची नोकरी त्याच्या काकांनी केलेल्या उपकारामुळे मिळालेली आहे. आहे ना आश्चर्याची गोष्ट!


एका मित्राला कॉलेजच्या जमान्यात प्रेम झालं होतं. यानंतर १० वर्ष हेच सुरू राहिलं. तो न लग्न करत होते, न त्या नात्यातून बाहेर येत होते. एकेदिवशी त्या मुलीने या सर्व गोष्टींना कंटाळून लग्न करण्याचा निर्णय घेतला. तो आजही दु:खी आहे. याने देखील लग्न झाले तरी देखील. 


हे ओढलेलं दु:ख आहे. यामुळे आपल्या परिवाराला, समाजाला दु:खाचं वातावरण मिळतं. एक स्वस्थ समाज नाही. हे ओढून घेतलेलं दु:ख जीवनात जाळ्यासारखं आहे.


काही मिळालं तर कमी नाही. मिळालं नाही तर का मिळालं नाही. मिळालं तर आणखी खूप चांगलं का नाही. आपण संपूर्ण उर्जेने दु:खाच्या अमरवेलाला चिपकलो आहोत. लपेटलेले आहोत.


यासाठी, कसेही आपले आत्ममूल्यांकन (रिव्यू)साठी वेळ नक्की काढा. हा रिव्यू आपल्याला ओढून घेतलेल्या दु:खातून मुक्त होण्यासाठी मदत करेल. दुसऱ्याच्या नावावर, दुसऱ्यांसाठी दु:ख सहन करत करत, आपला दु:खी राहण्याचा अभ्यास एवढा जूना झाला आहे की, यातून बाहेर येणे सोपं नाही, पण कधी ना कधी याची सुरूवात करावीच लागेल.


ईमेल : dayashankar.mishra@zeemedia.esselgroup.com


पता : डिअर जिंदगी (दयाशंकर मिश्र)
Zee Media, वास्मे हाऊस, प्लॉट नं. 4, 
सेक्टर 16 A, फिल्म सिटी, नोएडा (यूपी)


(लेखक 'झी न्यूज़'चे डिजिटल एडिटर आहेत)  (https://twitter.com/dayashankarmi)
(आपले प्रश्न आणि सूचना इनबॉक्‍समध्ये लिहा: https://www.facebook.com/dayashankar.mishra.54)