PHOTO : 6 अभिनेत्यांना केलं डेट, तर एकासोबत 9 वर्ष लिवइन रिलेशनशिप, 2 पत्नींना घटस्फोट दिलेल्या 4 वर्ष लहान अभिनेत्यासोबत लग्न

Entertainment : 6 अभिनेत्यांना डेट केल्यानंतर चार वर्ष लहान आणि तेही दोन पत्नीला घटस्फोट दिलेल्या अभिनेत्यासोबत तिने लग्न केलं. या प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलं का?

| Jan 06, 2025, 23:13 PM IST
1/10

दिल्लीत जन्मलेल्या आणि कोलकात्यात वाढलेल्या चित्रपटात बोल्ड इमेजसाठी ओळखली जाणाऱ्या या अभिनेत्रीचा 7 जानेवारी 1979 जन्म झाला. 46 व्या वर्षी ती आज एका मुलीची आई आहे. पण तिचे डेटिंगचे किस्से बॉलिवूडमध्ये खूप गाजलेय. 

2/10

ही अभिनेत्री आहे बिपाशा बसू लग्नापर्यंत तिने 6 अभिनेत्यांना डेट केलं होतं. तर 9 वर्षे एका अभिनेत्यासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. 

3/10

बिपाशा बसूचा पहिला बॉयफ्रेंड मिलिंद सोमण आहे. बिपाशाने मॉडेलिंगच्या काळात मिलिंदला डेट केले होते. बिपाशा मॉडेलिंगमध्ये आली तोपर्यंत मिलिंद सुपरमॉडेल म्हणून प्रसिद्ध होता. मॉडेलिंग असाइनमेंट दरम्यान ते मित्र बनले आणि एकमेकांना डेट करू लागले. बिपाशाने नंतर 1996 मध्ये गोदरेज सिंथोली सुपरमॉडेल स्पर्धा जिंकली. त्यानंतर, हे जोडपे वेगळे झाले.

4/10

बिपाशा 'राझ' चित्रपटातील अभिनेता डिनो मोरियाच्या जवळ आली. त्यांच्या नात्याची बी-टाऊनमध्ये खूप चर्चा झाली. रिपोर्टनुसार, 'राझ' चित्रपटाच्या शूटिंगपूर्वीच दोघेही रिलेशनशिपमध्ये आले होते. पण 2002 मध्ये हे दोघे वेगळेही झाले. नंतर डिनोने एका मुलाखतीत सांगितले होतं की, 'मी लहान होतो आणि तीही, मी तिला पहिल्यांदा मुंबईत डेट केलं होतं'.

5/10

डिनोनंतर बिपाशा अभिनेता जॉन अब्राहमसोबत रिलेशनशिपमध्ये आली. ते इंडस्ट्रीतील सर्वात हॉट जोडप्यांपैकी एक मानलं जात होतं. दोघे 9 वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होतं. जॉनचं दुसऱ्या मुलीसोबतच अफेयर समोर आलं होतं, त्या एका मेसेजमुळे हे गुपित उघड झालं होतं. त्यानंतर ती जॉनपासून वेगळी झाली. 

6/10

'बाहुबली'मुळे प्रकाश झोतात आलेला दक्षिण अभिनेता राणा दग्गुबातीचाही या यादीत समावेश आहे. बिपाशा आणि राणा यांनी 2011 मध्ये एकत्र 'दम मारो दम' या एकत्र काम केलं. या चित्रपटाच्या सेटवर दोघेही प्रेमात पडले पण हे नातेही फार काळ टिकले नाही. रिपोर्टनुसार, राणाने बिपाशाची फसवणूक केल्यामुळे हे जोडपे वेगळे झाले.

7/10

बिपाशाचे नावही सैफ अली खानसोबतही जोडले गेलं. त्यांच्या लिंकअपची बातमी 'रेस-2' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आली होती. त्यावेळी अमृतापासून घटस्फोट घेतल्यानंतर सैफ अविवाहित होता, मात्र ऑक्टोबर 2012 मध्ये त्याने करिनासोबत दुसरं लग्न केलं आणि ही अफवा थांबली. 

8/10

19 फेब्रुवारी 2014 या तारखेला बिपाशाने अभिनेता हरमन बावेजासोबत तिच्या सहाव्या अफेअरची पुष्टी दिली. तिने ट्विट केलं होतं की, 'हरमन आणि मी जोडपे आहोत. शेवटी मला ती व्यक्ती सापडली आहे जी माझ्यासारख्या माणसापेक्षा कितीतरी चांगली आहे.' पण अवघ्या 6 महिन्यांनी हे जोडपे वेगळे झाले. 

9/10

त्यानंतर 'अलोन' (2015) चित्रपटाच्या सेटवर बिपाशा करण सिंह ग्रोवरला भेटली होती. शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि दोघांच्या डेटिंगच्या बातम्या येऊ लागल्या. जवळपास एक वर्ष डेट केल्यानंतर बिपाशाने 30 एप्रिल 2016 रोजी बंगाली रितीरिवाजांनुसार करणसोबत लग्न केलं. 12 नोव्हेंबर 2022 मध्ये बिपाशानं मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचं नाव देवी असं आहे. 

10/10

बिपाशाच्या आधी करणने दोनदा लग्न केलं होतं. त्यांची पहिली पत्नी श्रद्धा निगम (2008-2009) आणि त्यांची दुसरी पत्नी जेनिफर विंगेट (2012-2016) होती.