डिअर जिंदगी: सगळ्यांना बदलण्याचा हट्ट !
कोणालाही भेटल्यानंतर आपण त्याला `जसा आहे` ऐवजी `जसा पाहिजे` तसा बनवण्याचा प्रयत्न करतो. बदलण्याच्या हट्टात आपण स्वत:ला विसरुन जातो. जो जसा आहे त्याच भावनेने त्याचा स्विकार केला पाहिजे. हे नात्यांना तणावापासून वाचवण्याचं टॉनिक म्हणून काम करतं.
दयाशंकर मिश्र : दुसऱ्याला आपण नेहमी आपल्या सारखं पाहण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला जसं आवडतं तसंच त्याला पाहायचं असतं. आपण विचार करतो तसा तो आहे तर ठीक, नाहीतर आपल्याला असं वाटतं की त्याने आपल्या विचारांप्रमाणे बदलावं. नात्यांमध्ये वाढत चाललेला हा विचार तणाव आणि निराशाकडे ढकलत आहे.
आपण दुसऱ्याला कसं पाहतो. यामुळे आपल्या जीवनात खूप काही ठरतं. मी माझ्या वैयक्तिक अनुभवातून या गोष्टीची पुष्टी करु शकतो की, असं केल्यामुळे वस्तू आणि व्यक्तींबद्दलचा माझा दृष्टीकोन बदलला आहे. आता मी अनेक लोकांसोबत प्रेम, स्नेह आणि आत्मियतेने वागतो. पण एक दशकआधी कदाचित मी देखील लोकांना माझ्याच चष्म्याने पाहत होतो.
खरंतर कोणालाही भेटल्यानंतर आपण लगेचच त्याच्या बद्दलचा दृष्टोकोन बनवणं सुरु करतो. जो जसा आहे तसं स्वीकारण्याऐवजी आपण त्याला आपल्यानुसार बदलण्याचा प्रयत्न करतो.
कोणालाही भेटल्यानंतर आपण त्याला 'जसा आहे' ऐवजी जसा पाहिजे तसं बनवण्याचा प्रयत्न करतो. बदलण्याच्या हट्टात आपण स्वत:ला विसरुन जातो. जो जसा आहे त्याच भावनेने त्याचा स्वीकार केला पाहिजे. हे नात्यांना तणावापासून वाचवण्याचं टॉनिक म्हणून काम करतं.
आपण स्वतःला कसे स्थिर ठेवतो. आपण म्हणतो देखील, मला बदलणं सोपं नाही. मी आहे तसा आहे. असं यामुळे कारण आरशात आपण आपली प्रतिमा छानच समजतो. किती छान आहे मी. हा भाव 'सेल्फी'च्या काळात तीव्रतेने वाढला आहे. इतकंच नाही तर हा आपल्याला स्वत: बद्दलच्या खऱ्या विचारांपासून देखील प्रत्येक दिवशी दूर घेऊन जात आहे.
जर कोणी असं भेटलं, जो आपल्याला काही सांगू किंवा शिकवू इच्छित असेल. तर त्याला साथ देणं कठीण होऊन जातं. कारण 'सेल्फी' कॅमेरा आता मुख्य कॅमेऱ्या पेक्षा अधिक चांगला आणि खोल फोटो काढत आहे. यामुळे सगळ्या बाजुने आपला फोटो चांगलाच येतो.
हळू-हळू 'सेल्फी' कॅमेरा प्रत्येकाच्या जीवनात आला आहे. याचा परिणाम असा झाला की, प्रत्येक जण आपल्या अदावर फिदा आहे. आपण स्वत:ला बदलू नाही इच्छित पण दुसऱ्याला बदलण्याचा हट्ट धरतो.
हा आपला आपल्याच व्यक्तींच्या विरुद्ध असलेला एक विचित्र लढा आहे. मी बदलणार नाही. पण मला तुम्हाला बदलायचं आहे. जीवनात तणाव का असणार नाही जर छोट्या छोट्या गोष्टीही आयुष्यभराचा द्वेष निर्माण करीत आहे.
मध्यप्रदेशच्या इंदूरमधून संबंधांमधील अविश्वासाची एक धक्कादायक घटना समोर आली. आपण एकमेकांवरील विश्वास खूप लवकर गमवत चाललो आहोत. दुसऱ्य़ांना सोडा पण पती-पत्नी यांच्यातील मतभेद, वाद, निराशा ही घुटमळ बनत चालली आहे.
मध्य प्रदेशमधील मुख्य वर्तमानपत्र 'दैनिक भास्कर'च्या नुसार, इंदूरमधील पॉश कॉलनी शालीमार पाम्समध्ये राहणारे कमर्शियल टॅक्सचे उपायुक्त दीपक कुमार श्रीवास्तव यांच्या पत्नीने आत्महत्या केली. त्याआधी त्यांनी पतीला फोनवर सांगितलं की, त्यांची जगण्याची इच्छा आता संपली आहे. त्या आत्महत्या करत आहे. पतीने खूप समजावलं. घरी येईपर्यंत थांबवण्यास सांगितलं. पण पत्नीने फोन ठेवला आणि फाशी घेत आत्महत्या केली. पतीने आपल्या १४ वर्षाच्या मुलाला देखील फोन केला. पण तो व्हिडिओ गेम खेळण्यात इतका व्यस्त होता की त्याने फोन देखील उचलला नाही. दीपक यांनी शेजारच्या व्यक्तींना देखील फोन केला पण तोपर्यंत उशीर झाला होता.
३ दिवसापूर्वी पती-पत्नीमध्ये एका गोष्टीवरुन वाद झाला होता. त्यानंतर दोघेही बोलत नव्हते असं म्हटलं जात होतं.
यावर कोणत्याही निष्कर्ष काढण्याआधी थोडं मागे जा. आपण पाहिलं असेल की आपल्या आई-वडिलांमध्ये देखील वाद होत होते. पण अशा वादाची कठोर शिक्षा स्वत: ज्याच्यावर आतापर्यंत प्रेम केलं त्याला देणं. हे जीवनाच्या सिद्धांताच्या विरुद्ध आहे.
पती-पत्नीसह कोणत्याही नात्यात असहमती, वाद सामान्य घटना आहे. अनेकदा असं काही घडतं जो आपल्या हदयावर नेहमी आघात करत असतो. त्यामुळे आपण अस्वस्थ होऊन जातो. कोणी आपल्याला समजून घेईल का, तो काय म्हणेल... या भीतीने आपण कोणालाच काही सांगत नाही. पण याचा अर्थ असा पण नाही की दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा स्वत:ला द्यावी.
आपण कोणाला बदलू नाही शकत. दुसऱ्याला बदलणं शक्यच नाही. होय... काही बदल शक्य आहे. पण त्यासाठी जिवंत राहणं तर आवश्यक आहे. संवाद, प्रेम, स्नेह गरजेचं आहे, आत्महत्या नाही. हा मानवते विरुद्ध गुन्हा आहे.
आपल्या जवळ काही व्यक्ती अशा ठेवा. जो नेहमी तुमचं म्हणणं ऐकायला तयार असेल. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करु शकाल. अशा व्यक्तींपासून काहीच लपवू नका. हेच तुमच्या जीवनातील खरे अँटी व्हायरस आहेत. स्मार्टफोन, लॅपटॉपला व्हायरसपासून वाचवण्यासाठी अँटी व्हायरस गरजेचं असतं. तसंच जीवन वाचवण्यासाठी अँटी व्हायरस पाहिजे. तुमचा अँटी व्हायरस नाही आहे ? तर त्याची लवकर ओळख करुन घ्या.
आणि हा... तुमचा प्रिय कॉलम 'डिअर जिंदगी'च्या संपर्कात काही बदल होत आहेत. खालील ईमेलवर तुम्ही संपर्क करु शकता.
ईमेल : Dayashankarmishra2015@gmail.com
तुमचा प्रिय कॉलम 'डिअर जिंदगी' बाबत महत्त्वाची सूचना : ६ मार्च २०१९ पासून हा कॉलम तुम्हाला झी २४ तासच्या वेबसाईटला मिळणार नाही.
तुम्ही फेसबुक पेज (https://www.facebook.com/dayashankar.mishra.54) आणि ट्विटर (https://twitter.com/dayashankarmi) वर हा कॉलम वाचू शकता.
संवाद साधण्यासाठी ट्विटर, फेसबुकला फॉलो करा.