पोपट पिटेकर, मुंबई : शेती करताना नेहमीच आपण पारंपरिक पीक घेत असतो. तेच तेच पिक घेऊन नफा कमी पंरतु तोटा जास्त सहन करावा लागतो. पंरतु काही शेतकरी असे देखील आहेत. की शेती करुन मोठ्या प्रमाणात पैसे कमावताना दिसत आहे. शेतकऱ्यांनी शेती विषय चांगली माहिती घेऊन शेती केली तर नक्कीच त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. ऊस, गहू, बाजरी, कडधान्य या व्यतिरिक्त शेतीच्या जोडीला आधुनिकतेची जोड दिली तर चांगला नफा शेतकरी मिळवू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारळ असं एक पिक आहे. जिथे कमीत कमी पैसा गुंतवून जास्तीत जास्त नफा कमवू शकतो. त्यामुळे नारळाचं पिक हे शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय ठरवू शकतो. कारण नारळाच्या पाण्याची मागणी पूर्ण देशात आहे. दक्षिण भारताच्या व्यतिरिक्त पूर्ण देशात तुम्ही नारळच्या पाण्याची विक्री होताना नेहमी पाहत आहात. 


नारळाच्या पाण्याचा व्यवसाय अजून चांगलं करण्यासाठी चांगले प्रयत्न देखील चालू आहेत. दक्षिण भारतात तर नारळाचं पाणीची भविष्यातील गरज पाहता प्रोसेसिंग करुन बॉटलमध्ये भरुन विक्री देखील होत आहे.


नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. नारळ हे भरपूर प्रमाणात पोषक असल्यामुळे नारळ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच धार्मिक कार्यक्रमासाठी देखील देशात नारळाचं वापर मोठ्या प्रमाणात होतो. याच कारणामुळे नारळाला मोठ्या प्रमाणात मागणी असते. 


नारळाचं पाणी पिण्याबरोबर नारळाचा वापर पूजेसाठी देखील होतो. म्हणूनच नारळाची शेती करणारे शेतकरी फायदेशीर ठरतात. नारळाच्या पाण्यात सोडियम, पोटेशियम, कॅल्शियम, मॅग्निशियम, लोह, ताम्र, फॉस्फोरस, क्लोरिन, गंधक, विटामिन सी आणि अधिक मात्रामध्ये विटामिन बी देखील नारळात आढळतं. नारळाचं पाणी फक्त तहान भागवत नाही, तर ताप कमी करण्यासाठी देखील गुणकारी आहे. त्याचबरोबर नारळाचं तेल देखील केसं वाढीसाठी फायदेशीर असतं.


त्वचा रोग नष्ट करण्याबरोबर अशक्तपणा कमी करण्यासाठी मदत देखील नारळ करतो. या सर्व फायद्यामुळे शेतकरी नारळाची शेती करतात. जास्त करुन दक्षिण भारताच्या किनारी भागात नारळाची लागवड केली जाते. नारळाचं उत्पादन केरळ, कर्नाटक,आंध्रप्रेदश आणि तमिळनाडू मध्ये सर्वात जास्त होतं.


नारळच्या पाण्याची मागणी पूर्ण देशात नेहमी असते. दक्षिण भारतात बरोबर इतर देशात देखील नारळाच्या पाण्याची विक्री होत असतो. नारळाच्या पाण्याचा व्यवसायला अजून चांगलं करण्याचा प्रयत्न चालू आहे. दक्षिण भारतात तर नारळाच्या पाण्याची मागणी पाहता तिथे तर नारळाचं पाणी बॉटलमध्ये भरुन मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. प्रोसेसिंग करण्यासाठी चांगल्या क्वालिटीसाठी हिरव्या नारळाची निवड केली जाते. प्रोसेसिंग यूनिटमध्ये जाऊन नारळ मधून पाणी काढलं जातं. त्यानंतर पॅकिंग करुन नारळाचं पाणी बाजारात विक्री केली जाते.


अनेक देशात नारळच्या पाण्याच्या बॉटलची निर्यात


कुठेही नारळ विक्री करणं सोप आहे. पंरतू नारळ पाणी हे बंद बॉटलमध्ये विक्री होताना दिसत नाही. आपल्याला नारळ पाणी हे अनेक ठिकाणी सहज उपलब्ध होतो. पंरतू आता ठिक ठिकाणी बाजारात बॉलटची निमित्ती होताना दिसत आहे. युरोपीय देशा व्यतिरिक्त अमेरिका हे देखील बॉटलची निर्यात करणार आहे. हे झालं नारळाच्या पाण्याचं... नारळाचं संपूर्ण भागापासून अनेक प्रोडक्ट तयार होतात. 


नारळचं नारळ पावडर, नारळ दूध, नारळ दूध पावडर, कॉयर फाइबर आणि कोकोपीट यासारख्ये उत्पादन बनवलं जातं. कोळसा कडक कवचापासून तर व्हिनेगर परिपक्व नारळाच्या पाण्यापासून बनवलं जातो. यापासून दोरीही बनवली जाते. तुमच्याकडे नारळाची खूप झाडं आहेत. तर तुम्ही नारळ काढून त्याची विक्री करुन दरमहिने पैसेही मिळवू शकता. त्यामुळे तुम्ही जर नारळाची शेती करत नसाल तर नक्की नारळाच्या शेतीचा विचार करा आणि पैसे कमवा.