पोपट पिटेकर, मुंबई : शेतकरी दोन ते तीन महिन्यात पैसे कमविण्यासाठी अनेक पद्धतीचे पिक नेहमीच घेतो. परंतू ते पिक घेऊन जर चांगला नफा मिळत नसेल तर, तुम्हाला आम्ही आज अशा पद्धतीचं पिक सांगणार आहोत, जे फक्त तीन महिन्यात तुम्हाला भरघोस नफा देऊ शकेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रताळे भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. रताळं हे पांढरा आणि लाल असे दोन प्रकाराचे असतात. लाल रताळे हे खाण्यास जास्त गोड असते. आणि गुणांनी देखील जास्त चांगले असते. उपवासाचे दिवशी याचा खाद्य म्हणून वापर अनेक ठिकाणी होतो. रताळ्याची लागवड महाराष्ट्रासह ओडिशा, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. 


लागवड कशी करावी?


रताळ्याची रोपे हे एक महिना अगोदर तयार केली जातात. रताळ्याची रोपे तयार केलेल्या कलमांप्रमाणे रोपवाटिकेत लावली जातात. त्यासाठी रोपवाटिकेत बिया टाकून वेल तयार करुन घेतल्यानंतर ते शेतात लावले जाते. 


लागवडीसाठी माती 


रताळ्याच्या लागवडीसाठी चिकणमाती सर्वात योग्य मानली जाते. रताळ्याची लागवड कठीण, खडकाळ आणि पाणी साचलेल्या जमिनीवर अत्यंत हानिकारक ठरू शकते. ज्या जमिनीवर रताळ्याची लागवड केली जात. त्या जमिनीचे पीएच मूल्य हे 5.8 ते 6.8 दरम्यान असणं गरजेचं आहे.


कोणत्या हंगामात लागवड कराल?


रताळ्याची लागवड हे तुम्ही तिन्ही हंगामात करु शकता. परंतु रताळ्याची लागवड हे तुम्ही पावसाळ्यात केली तर तुम्ही फायदेशीर ठरु शकता. या हंगामात रताळ्याची रोपे चांगली वाढतात. तसेच रोपांच्या वाढीसाठी 25 ते 34 अंश तापमान सर्वोत्तम आहे. 


किती नफा?


रताळ्याची रोपे लावल्यानंतर 125 ते 140 दिवसांत तयार होतात. तुम्ही एक हेक्टरमध्ये रताळ्याची लागवड करुन 25 टनांपर्यंत उत्पादन घेऊ शकता. तुम्ही बाजारात रतळं हे एक किलो 20 रुपायांनी जरी विकलं तरी 25 टनांचे तब्बल 5 लाख रुपये पर्यंत नफा सहज कमवू शकता.