पोपट पिटेकर, मुंबई : शेती करण्यासाठी सर्वात गरजेची गोष्ट म्हणजे वीज. वीज असेल तर कोणत्याही पद्धतीचे पीक आपण घेऊ शकतो. परंतू वीज नसेल तर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या विजेमुळे अनेक राज्य हे वीज संकटाचा सामना करताना आपल्याला पाहायला मिळतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वीज संकटामुळे अनेक उद्योग धंद्याबरोबर शेतीचं देखील मोठं नुकसान होत असतं. वीज संकटाच्या विरोधात अनेक ठिकाणी आंदोलन देखील होत असतात. ग्रामीण भागात तर वीज पुरवठ्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. वीज संकटामुळे अनेक पिकांच्या उत्पादनात मोठी घट देखील होत आहे. त्यामुळे शेतक-यांच्या या समस्यावर मात करण्यासाठी केंद्रशासन बरोबर राज्यशासन देखील नवनवीन योजना शासनाच्या वतीने राबवतात. त्यापैकीच एक म्हणजे ‘पंतप्रधान कुसुम योजना’.  


या योजनेच्या माध्यमातून तुम्ही सौरपंप लावून 90 टक्के अनुदान मिळवू शकतात. तब्बल 60 टक्के सबसिडी शेतक-यांना सौरपंप लावण्यासाठी पंतप्रधान कुसुम योजनाच्या माध्यमातून तब्बल 60 टक्के अनुदान मिळणार आहे. त्याचबरोबर सौरपंप 


उभारण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून 30 टक्के कर्ज देखील तुम्हाला दिलं जाणार आहे. त्यामुळे शेतक-याना या सौरपंपाच्या प्लांटसाठी फक्त 10 टक्केच खर्च करावे लागणार आहे. 


या योजनेंतर्गत शेतक-यांना सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी 18 लाखांचा निधीही दिला जाणार आहे. शासनाच्या वतीने ऐवढी मोठी सवलत असणा-या या योजनेचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या. 


सौरपंपामुळे उत्पादन वाढेल

शेतक-यांची सर्वात मोठी अडचण म्हणजे विज नसणे. परंतू सौरपंप उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतीला काहीसा दिलासा मिळेल. शेतकऱ्यांना पिकांच्या सिंचनासाठी आता विजेवर अवलंबून राहावं लागणार नाही. आता शेतकरी गरजेनुसार सोलर पंपाच्या साहाय्याने पिकांना सिंचन करू शकेल. त्यामुळे त्याचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनावर होणार आहे. 


वीज विकून पैसे कमवू शकता.


तुम्ही शेतीच्या सिंचनाबरोबर वीजनिर्मितीसाठी सौरपंपाचाही वापर करु शकता. जर तुमच्याकडे 4 ते 5 एकर जमीन असेल तर तुम्ही एका वर्षात सुमारे 14 लाख वीज युनिट्स तयार करू शकता. 


तुम्ही वीज विभागाला 3 ते 7 रुपये दराने विक्री करून तब्बल वार्षिक 45 लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळू शकते. या योजनेचा कोणताही शेतकरी फायदा घेऊ शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतक-यांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकता. त्यासाठी mnre.gov.in या वेबसायटवर जाऊन अर्ज करावे. 


याशिवाय अनेक राज्ये त्यांच्या स्तरावर केंद्र सरकारच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत अनुदान देण्याचे काम देखील करतात. पंतप्रधान कुसुम योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन शेतकरी या योजनेबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात. या योजनेच्या माध्यमातून सौरपंप अगदी सहज घेऊ शकतात.