PHOTO : 8 वर्षांच्या अफेअरनंतर ॲमेझॉनचे मालक वयाच्या 60 व्या वर्षी दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर, लग्नासाठी खर्च करणार 50,97,15,00,000 रुपये, कोण आहे मिसेस बेसोज?

Jeff Bezos Wedding : जगातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि Amazon चे संस्थापक जेफ बेझोस पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहे. बेसोज वयाच्या 60 व्या वर्षी शाही लग्न करणार आहेत. बेसोजची यांची दुसरी पत्नी कोण आहेत पाहूयात.

| Dec 22, 2024, 21:28 PM IST
1/9

ॲमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती जेफ बेझोस यांची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. 8 वर्षांच्या अफेयरनंतर 55 वर्षीय गर्लफ्रेंडसोबत ते लग्न करणार आहेत. 2018 मध्ये त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यावेळी ते दोघेही विवाहित होते.   

2/9

जेफ बेझोस हे प्रसिद्ध टीव्ही पत्रकार आणि टीव्ही होस्ट लॉरेन सांचेज हिच्याशी लग्न करणार आहे. या लग्नासाठी जगभरातून निवडक वस्तू आयात केल्या जात आहेत. लग्नाचा केक पॅरिसहून मागवला आलाय. तर हेअर स्टायलिस्ट न्यूयॉर्कहून येणार आहे. या लग्नात जगभरातील प्रसिद्ध म्युझिकल बँड परफॉर्म करणार आहेत. या लग्नात सजावटीची थीम विंटरलँड ठेवण्यात आली आहे.     

3/9

न्यूयॉर्क पोस्टनुसार, जेफ बेझोस आणि लॉरेन सांचेज यांचा विवाह येत्या शनिवारी म्हणजेच 28 डिसेंबर होणार आहे. जरी आतापर्यंत जेफ बेझोस किंवा लॉरेन सांचेज यांच्याकडून लग्नाच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हे लग्न अविस्मरणीय बनवण्यासाठी बिल गेट्स, लिओनार्डो डिकॅप्रियो आणि जॉर्डनची राणी रानिया यांसारख्या व्यक्ती सहभागी होणार आहेत.

4/9

साहजिकच लग्न जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचे असेल तर तयारीही तितकीच खास असेल. जेफ आणि लॉरेनचे लग्न कोलोरॅडोच्या अस्पेन शहरात होणार आहे. हा विवाह अतिशय भव्यदिव्य स्वरुपात असणार आहे. लग्नाची जय्यत तयारी सुरू असून रिपोर्ट्सनुसार, या लग्नाचा खर्च जवळपास 600 मिलियन डॉलर्स म्हणजेच 5096 कोटींच्या घरात होणार आहे. 

5/9

डेलीमेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात एका सूत्राच्या हवाल्यानुसार, केविन कॉस्टनरचे 160 एकरचे शेत लग्नासाठी निवडण्यात आलंय. लग्नाआधीचे सर्व सोहळे हे पॉश सुशी रेस्टॉरंट मात्सुहिसा इथे संपन्न होणार आहे. 26 आणि 27 डिसेंबरसाठी बुकिंग करण्यात आलंय. 

6/9

या दोघांनीही आपल्या जोडीदारांना घटस्फोट दिलाय. बेझोस आणि मॅकेन्झी स्कॉट यांच्या घटस्फोटाची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. 54 वर्षीय लॉरेन एक व्यावसायिक हेलिकॉप्टर पायलट आहे.   

7/9

बेझोससोबत तिचे नाते सुरू करण्यापूर्वी लॉरेनने 2005 मध्ये हॉलिवूड एजंट पॅट्रिक व्हाइटसेलशी लग्न केलं होतं. हे लग्न 13 वर्षे टिकले आणि 2019 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. पॅट्रिकसह तिला दोन मुलं आहेत. मुलाचं नाव इव्हान आणि आयला आहे. 

8/9

बेझोस यांनी 2019 मध्येच त्यांची पत्नी मॅकेन्झी स्कॉट हिला घटस्फोट दिला. दोघांनी लग्नाच्या 25 वर्षांनंत 1994 मध्ये घटस्फोट दिला. बेझोस यांना तीन मुलगे आणि एक दत्तक मुलगी आहे. मॅकेन्झी देखील जगातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहे. तिने विज्ञान शिक्षक डॅन जेवेटशी लग्न केलंय. 

9/9

बेझोस यांची एकूण संपत्ती 20.26 लाख कोटींच्या घरात आहे. जगातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती बेझोस हे ॲमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ असून ते वॉशिंग्टन पोस्ट न्यूज मीडिया हाऊसचे मालक आणि ब्लू ओरिजिन नावाच्या सब-ऑर्बिटल स्पेसफ्लाइट सेवेचे संस्थापक देखील आहेत.