मुंबई : जागतिक दर्जाची भारतातील पहिली शानदार क्रूझशीप कर्णिका भारतात सुरू झाली आहे. जलेश क्रूझशीपची आंतरराष्ट्रीय पातळीवरील, कर्णिका ही क्रूझशीप १४ मजल्यांचा जणू समुद्रात तरंगणारा महल आहे. २ हजार ७०० प्रवासी क्षमतेसह कर्णिका क्रूजची लांबी २५० मीटर आहे. समुद्रात तरंगणारं हे क्रूझ 7-स्टार हॉटेलपेक्षाही अधिक आरामदायक, आणि विलक्षण वाटतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोवाच्या क्रूझ टर्मिनलवरील जलेश क्रूझची भव्यता पाहिल्यानंतरएक वेगळा अनुभव येतो. भारतातील सर्वप्रथम शानदार क्रूझशीप-कर्णिकाची क्रूझ सेवा सुरू झाली आहे. कर्णिकाचा पहिला प्रवास पूर्ण झाला आहे. मुंबईमधून काल सायंकाळी निघालेली कर्णिका, रात्रभर प्रवास पूर्ण केल्यानंतर सकाळी गोव्यात पोहोचली.


या यात्रेनंतर कर्णिकाने पर्यटनमधील एक नवी उंची पार केली आहे. जलेश क्रूझची कर्णिका आता भारतात लॉन्च झाल्याचं आपण म्हणू शकतो. क्रूझच्या प्रवासाचा अनुभव असा होता की, पर्यटकांच्या आनंदाचा पारावर नव्हता.


क्रूझच्या प्रवासाचा अनुभव असा होता की, पर्यटकांच्या आनंदाला पारावर नव्हता. प्रवासी जेव्हा हा प्रवास करून आल्यानंतर कर्णिकातून खाली उतरवत होते, तेव्हा कर्णिकाच्या प्रवासाची प्रशंसा करत होते. या लोकांच्या मते, आदरतिथ्य खूप चांगलं केलं जातं आणि क्रुझमधील कार्यक्रम देखील खूपच छान आहेत. 


क्रुझवर वाढदिवस साजरा केल्यानंतर परत आलेल्या अक्षता माळी यांनी सांगितले की, वाढदिवस साजरा करायला आम्ही क्रूझवर आलो होतो, आणि हा अनुभव खूपच छान आणि मजेदार होता. 


जीवनभर हा अनुभव माझ्या आठवणीत असणार आहे. दीपक नावाच्या आणखी एका प्रवाशाने सांगितले की, ही एक अदभूत क्रूझ आहे, देशात पहिल्यांदा सुरु झालेल्या क्रूजचा मी साक्षीदार आहे. अशा क्रूजवर प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी सांगायला काही ना काही चांगला अनुभव आहे. 


कुणी क्रुझवरील आदरतिथ्यं अनुभवण्याविषयी बोलत होता, तर कुणी संगीत मैफिलीविषयी. हिमांशू पटेल नावाचा आणखी एक प्रवासी म्हणत होता, मी देशाच्या पहिल्या प्रीमियम क्रूझचा साक्षीदार आहे. मी लोकांना सांगेन की त्यांनी यावं, आणि प्रीमियम क्रूझचा आनंद घ्यावा.


पर्पल आणि पिंकिश रंगाचं आकर्षक कर्निका क्रूझ अरब सागरात तरंगताना त्यात प्रवास करण्याचा अनुभव स्वर्गापेक्षा कमी नाही. कार्निका क्रूझशीप ही १४ मजल्यांची क्रूझ आहे. २ हजार ७०० प्रवासी क्षमतेसह कार्निका क्रूजची लांबी २५० मीटर आहे. या क्रूझला पाहून डोळे विस्फारतात, समुद्रात तरंगणारं हे क्रूझ, सेव्हन स्टार हॉटेल पेक्षा कमी नाही.


कर्णिका क्रूझचा बाहेरचा नजारा काही और आहे, एवढं शानदार दृश्य तुम्ही कधी पाहिलंच नसेल. या शानदार क्रूझमध्ये प्रवेश केल्यानंतर डोळे दिपावणारी दृश्य तुम्हाला दिसतील. चौदा मजल्याच्या कर्णिका क्रूझमध्ये प्रवेश करताना, जगातील सर्व सौंदर्यवान गोष्टी तुमच्यासमोर असल्याचा भास होतो. 


क्रूझमध्ये शॉपिंग करण्यासाठी शानदार शॉपिंग सुविधा उपलब्ध आहे. खूपच आकर्षक असलेल्या रेस्टॉरंटमध्ये देशी-विदेशी पर्यटकांच्या जिभेवर सतत चव रेंगाळेल असे मेन्यू आहेत. मनोरंजनासाठी क्रूझवर खास कॅसिनोची व्यवस्था केलेली आहे. समुद्रात तरंगणाऱ्या या कर्णिकात दोन मोठे स्विमिंग पूल देखील आहेत, ज्यात तुम्ही स्विमिंग करण्याचा अनुभव घेऊ शकतात. क्रूझमध्ये युवक आणि लहान मुलांच्या मनोरंजनाचा देखील विचार करण्यात आला आहे. मुलांसाठी असणारं वॉटरपार्क देखील खूपच आकर्षक आहे.


कर्णिका क्रूझमध्ये प्रवेश करताना, प्रवाशांना त्यांच्या खोल्यांमध्ये पाऊल ठेवतांना क्रूझवर विशेष आदरतिथ्यं केलं जातं हे जाणवणे स्वाभाविक आहे. खोल्यांमध्ये सजवलेल्या खास खिडक्या समुद्रातील आकर्षक दृश्याकडे नजर पुरवतात. आणि विशेषतः खोल्यांच्या बाहेर असलेली बाल्कनी, पर्यटकांना जगातील आकर्षक दृश्यांपर्यंत नेतात. आंतरराष्ट्रीय पहिल्या क्रूझ जहाजचा प्रवास करणे प्रत्येकाला आवडेल. कर्णिका क्रूझशीपमध्ये प्रवास करताना हृदय आकर्षक आणि नवनवीन दृश्य पाहून फुलतं. 


क्रूझवर 24 तास उघडं राहणारं कॉफीशॉप आहे. यात अगदी अतिथींच्या आवडत्या घरगुती व्यंजनांपर्यंत लक्ष ठेवण्यात आले आहे. क्रूझचे सीईओ, जर्जेन बेलम म्हणतात की, ही भारताची पहिली क्रूझशीप आहे. यात प्रवास करणं खूप शानदार अनुभव आहे. आतिथींची विशेष काळजी घेतली जाते. यात प्रत्येक सुखसुविधा देण्यात आली आहे. खरेदीपासून मनोरंजनापर्यंत सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. भारतातील क्रूझ जहाजमध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला भारतीय डोसापासून आणि इतर सर्व पदार्थ उपलब्ध आहेत. 


या क्रूझच्या बाबतीत ट्रॅव्हल अँड टूर इंडस्ट्रीचे लोक म्हणतात की, यामुळे देश आगामी काळात पर्यटन क्षेत्रात नवीन उंची गाठू शकणार आहे. टूर ऑपरेटर दिग्विजय त्रिपाठी म्हणतात की, जे लोक परदेशात जावून क्रूझच्या सफरीचा आनंद घेत होते, त्यांना आता ही सुविधा देशातच मिळणार आहे, त्यामुळे जास्तच जास्त लोक हा प्रवास अनुभवू शकतील.


कर्णिका क्रूझशीप आपल्या वेगवेगळ्या मार्गांविषयी माहिती देणार आहे. मुंबई-गोवा-मुंबई या मार्गावर ही सेवा सुरू झाली आहे. ही आकर्षक, सर्वोत्तम क्रूझशीप सेवा, मुंबई-चेन्नई, विशाखापट्टणम मार्गांवर देखील उपलब्ध असेल. कर्णिका क्रूझशीप देशीविदेशी पर्यटकांसाठी, सिंगापूर, दुबई आणि खाडी देशातील सर्वात आकर्षक शहरांमध्ये देखील सेवा देणार आहे.


कर्णिका क्रूझशीप ही देशातील पर्यटन क्षेत्रातील नवं पाऊल असणार आहे. कारण भारतातील क्रूझ इंडस्ट्री वेगाने वाढत आहे. मागील दोन वर्षात, २०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय क्रूझच्या माध्यमातून, सव्वा दोन लाख पर्यटकांनी भारताचा दौरा केला. भारताचे पोर्ट यासाठी वेगाने विकसित होत आहेत. यातील प्रमुख सहा आहेत, त्यात मुंबई पोर्ट, मोर्मुगाव पोर्ट, न्यू मँगलोर पोर्ट, कोच्चीन पोर्ट, चेन्नई पोर्ट, आणि कोलकाता पोर्टचा समावेश आहे. 


आता एक भारतीय कंपनीने यात जोरदार पदार्पण केलं आहे. यात फक्त स्थानिक पर्यटन विकसित करण्यावर भर देण्यात आलेला नाही तर. भारतीय पर्यटकांना क्रूझ पर्यटनासाठी आंतरराष्ट्रीय क्रूझची गरज पडायला नको, हा देखील उद्देश आहे.