Maha Kumbh 2025: नागा साधूंना थंडी का लागत नाही? जाणून घ्या मनोरंजक उत्तर

 महाकुंभाची अनेक रहस्ये आहेत, अशा गुपितांपैकी एक रहस्य म्हणजे नागा साधूंनी नग्न राहण्याची परंपरा आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Jan 08, 2025, 14:32 PM IST

Naga Sadhu: महाकुंभाची अनेक रहस्ये आहेत, अशा गुपितांपैकी एक रहस्य म्हणजे नागा साधूंनी नग्न राहण्याची परंपरा आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

 

1/7

सांसारिक आसक्तीपासून दूर राहून अध्यात्मात तल्लीन राहणे ही नागा साधूंची प्रवृत्ती आहे.    

2/7

जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक कार्यक्रमांपैकी एक असलेला महाकुंभ 2025 लवकरच सुरू होणार आहे. बारा वर्षांनंतर आयोजित केल्या जाणाऱ्या या विधीलाही विशेष महत्त्व आहे. 2025 चा महाकुंभ जसजसा जवळ येत आहे तसतसा भाविक आणि साधूंबद्दल लोकांचा आदर आणि उत्सुकता वाढत आहे.

3/7

महाकुंभ सुरू होण्यापूर्वीच प्रयागराजमध्ये विविध आखाड्यांतील साधू जमतात. त्यावेळी तेथील नागा साधूंना पाहणे हा एक अनोखा अनुभव असतो. त्याचे फोटो सर्वत्र व्हायरल होतात.   

4/7

सामान्य लोकांना नागा साधूंबद्दल जाणून घ्यायला आवडते.  त्याची जीवनशैली इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे आणि कठोर तपश्चर्येत लीन होऊन ते देवाचे  ध्यान करतात.

5/7

कडाक्याच्या थंडीतही नागा साधू कपड्यांशिवाय कसे जगतात? हा अनेकांना प्रश्न पडतो. चला या प्रश्नाचे उत्तर जाणून घेउयात. 

6/7

करतात योग

नागा साधू प्राणायामसह अनेक योगाच्या प्रकारचा सराव करतात. यामध्ये ते आवर्जून श्वासोच्छ्वास नियंत्रित करायचा सराव करतात ज्यामुळे ते सहज  शरीराचे तापमान नियंत्रित करू शकतात. त्यांना लहानपणापासूनच योगाची शिकवण दिली जाते ज्याचा प्रभाव त्यांच्या आयुष्यभर दिसून येतो आणि अत्यंत थंडीतही त्यांना ते जाणवत नाही.

7/7

कोणता योगा करतात?

  योगाबद्दल बोलायचे झाल्यास, ते सहसा कुंडलिनी योग आणि तुम्मो सारखे योग करतात. हे शरीराला आतून उबदार ठेवते आणि ते सहज नग्न तपश्चर्या करु शकतात.  अनेक वर्षांच्या ध्यान आणि आध्यात्मिक अभ्यासातून, नागा साधू शारीरिक संवेदनांपासून अलिप्तता विकसित करतात. त्यांचे लक्ष भौतिक शरीरातून अध्यात्मिक जीवनाकडे वळते, ज्यामुळे त्यांची थंडीची संवेदनशीलता कमी होते.