पोपट पिटेकर, मुंबई : पावसाळा हा वृक्षारोपणासाठी योग्य काळ समजला जातो. पावसाळ्यात कोणतंही झाड लावलं तर उत्तम प्रकारे वाढतं. परंतू वृक्ष लावताना योग्य झाडांची निवड देखील करणं गरजचं असतं. तुम्हाला जर डाळिंबाची लागवड करुन पैसे कमवायचे असतील तर नक्की ही बातमी वाचा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात पारंपारीक शेती करुन पाहिजे तेवढा नफा मिळत नाही. त्यामुळे अनेक राज्य हे पारंपारीक शेतीपासून इतर फळं आणि बाग लागवडीसाठी शेतक-यांना प्रोत्साहन करत आहेत. त्याचबरोबर शेतक-यांना पाहिजे ती मदत देखील सरकार करताना दिसत आहे.


तुम्ही पाहिलं तर डाळिंब हे निरोगी शरीरासाठी सर्वोत्तम फळ मानले जाते. डाळिंब जेवढे सुंदर दिसते, तेवढेच त्याचे फायदेही अप्रतिम आहेत. 


डाळिंबाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. भारतात डाळिंबाची शेती सर्वात जास्त उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, हरियाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, आणि गुजरात मध्ये डाळिंबाची शेती शेतकरी करतात. डाळिंबाचं झाड हे 3 ते 4 वर्षात फळ देण्यासाठी योग्य होतं. म्हणजे झाडाला फळ यायला लागतं. 


महत्त्वाचं म्हणजे डाळिंबाचं झाड हे 24 वर्षापर्यंत जीवित राहू शकतं. तुम्ही अनेक वर्ष डाळिंबाच्या झाडापासून उत्पन्न घेऊ शकता.


रोपे लावण्यासाठी हा काळ सर्वोत्तम 


डाळिंबाची लागवड हे रोपांच्या स्वरूपात केली जाते. रोपे लावण्यासाठी पावसाळा हा सर्वात योग्य सिजन आहे. डाळिंबाची पेरणी हे तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअस असताना करावी. जर शेतकरी डाळिंबाची शेती करत असेल तर रोपे लावताना किमान एक महिने पहिले खड्डे खोदणे गरणं गरजेचं आहे. त्यानंतरच रोपाची लागवड करावी.


सिंचन केव्हा करावे


डाळिंबाच्या झाडांना सिंचनाची मोठी गरज असते. पावसाळ्याच्या दिवसात पहिलं सिंचन हे तीन ते पाच दिवसांच्या आधी करावे. पावसाळा संपल्यानंतर किमान 10 ते 15 दिवसांच्या अंतराने झाडांना पाणी द्यावे. डाळिंबाच्या सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर रोप वाढीसाठी सर्वात प्रभावी ठरतं. 


किती होतो नफा


डाळिंबाच्या एका झाडापासून किमान 70 ते 80 किलो फळ मिळतं. एका हेक्टरमध्ये सुमारे 4 हजार 800 क्विंटल फळ पिकवता येतो. शेती तज्ञांच्या मते एका हेक्टरमध्ये डाळिंबाच्या शेतीपासून आरामात तुम्ही 7 ते 8 लाख रुपये पर्यत उत्पन्न घेऊ शकता.