दिवा लावल्यानंतर 'ही' चूक कधीच करु नका, अन्यथा घरातील...

भविष्य पुराणानुसार, घरामध्ये जळणारा दिवा मध्यभागी कधीही विझू नये. 

| Oct 09, 2024, 18:19 PM IST
1/7

भगवान श्रीकृष्ण

वास्तविक, भविषय पुराणात भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला दिवा दान करण्याविषयी सांगितल्याचे वर्णन आहे.   

2/7

चुकीची पद्धत

यामध्ये भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला दिवा दान करण्याची, दिवा विझवण्याची, दिवा हटवण्याची आणि चोरण्याची पद्धत चुकीची असल्याचे सांगतात. 

3/7

दिवा विझू देऊ नका

भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणतात की, दिवा कधीच विझू देऊ नका. त्यासोबत तो ज्या ठिकाणी लावला आहे त्या ठिकाणीच राहू द्या.

4/7

निंदनीय कृत्य

भविष्य पुराणानुसार, भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, दिवा विझवणे हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे. त्याच्या मते, जो दिवा विझवतो तो एकडोळा होतो. तर जो दिवा चोरतो तो आंधळा होते. 

5/7

वैदिक ग्रंथ

भविष्य पुराणाबरोबर इतर वैदिक ग्रंथांमध्येही दिवा विझवण्यास मनाई आहे. तसे करणे योग्य मानले जात नाही. 

6/7

शुद्धिकरणाचे प्रतीक

लावलेला दिवा विझवणे म्हणजे अग्नी विझवण्यासारखे आहे. अग्नी हे पवित्रता आणि शुद्धिकरणाचे प्रतीक आहे. 

7/7

लक्ष्मी माता

दिवा विझवल्याने घराच्या संपत्तीही कमी होऊ शकते. लक्ष्मी माता रागावू  शकते.