हा संघ घेऊन कसोटीच्या जागतिक अंतिम सामन्यात पोहचता येणार नाही
इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी सामना भारताने मोठ्या फरकाने हरला. कसोटी क्रिकेटच्या जागतिक स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहचण्याच्या दृष्टीने हा
रवी पत्की, क्रिकेट विश्लेषक : इंग्लंड विरुद्ध पहिला कसोटी सामना भारताने मोठ्या फरकाने हरला. कसोटी क्रिकेटच्या जागतिक स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहचण्याच्या दृष्टीने हा काही शुभ शकुन नव्हे. पुढच्या तीन सामन्यात जिंकण्यासाठी संघात ताबडतोब काही बदल होणे आवश्यक आहे. जैसे थे धोरणाने मोठे नुकसान होऊ शकते.
गोलनदाजी आणि फ्लनदाजीत बदल अपेक्षित आहेत.इशांत शर्मा बऱ्याच दिवसांनी खेळत आहे. लयीत यायला त्याला अजून काही सामने जाण्याची शक्यता आहे.अशा परिस्थतीत त्याच्याच पद्धतीने बॉलिंग करणारा सिराज किंवा थोडा वेगळा शार्दुल ठाकूर संघात येऊ शकतो.
थोडया जुन्या चेंडूवर इंग्लंच्या गोलनदाजानी रिव्हर्स स्विंग वर दहशत निर्माण करून चांगल्या विकेट्स घेतल्या. आपले फास्ट बॉलर्स ते का करू शकले नाहीत ह्याचे उत्तर शोधून योग्य बदल व्हायला हवेत. सुंदर आणि नदीम ह्यापैकी कुणाच्या जागेवर कुलदीप यादवला खेळवता येईल हे पहायला हवे.सुंदर ने बॅटिंग छान केली पण त्याचे मुख्य काम विकेट्स घेणे आहे.
बॅटिंग मध्ये रहाणेच्या जागेवर राहुलला संधी मिळायला हवी. रहाणेने ऑस्ट्रेलियात शतक केलेले असले तरी आत्ता आणिबाणीत बदल आवश्यक आहे. ह्या सामन्याच्या दोन्ही डावात त्याच्या आऊट होण्याची पद्धत अगदीच नवख्या खेळाडूची होती. त्याचे शॉट सिलेक्शन आणि आऊट होण्याच्या पद्धती कायम बुचकळ्यात टाकणाऱ्या असतात.
अँडरसन रीव्हर्स स्विंग टाकतोय म्हणल्यावर त्याच्या सारख्या अनुभवी खेळाडूने क्रीजचा पुढे उभे राहायला पाहिजे. अँडरसन ने गिल आणि रहाणे दोघांना चांगले चेंडू टाकले.पण फलनदाज चेंडू कसा खेळतो त्यावरून बॉलर खरंच भेदक होता का तो तसा दिसला हे पहायला हवे.
टॉस महत्वाचा ठरला ह्या विषयी वाद नाही.पहिले दोन दिवस खेळपट्टी ठणठणीत होती.उत्तम खेळपट्टीचा फायदा इंग्लंडला मिळाला.तिसऱ्या दिवसापासून खेळपट्टीचा वरचा थर निघायला लागला आणि मग स्पिन जास्त होणे, चेंडू अनियमित बाऊन्स होणे हे सुरू झाले.भारताची पहिली बॅटिंग आली असती तर काही वेगळे घडले असते का ह्याचे उत्तर हो असे आहे.भारताने 140 पेक्षा जास्त ओव्हर्स निश्चित बॅटिंग केली असती.
जो रूट ला लवकर बाद केले तर सामन्यावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते हे धावफलकावरून लक्षात येते. त्याने एकट्याने दोनशे केला. विराटने खराब खेळपट्टीवर पाचव्या दिवशी कसे खेळायचे ह्याचा वस्तुपाठ दाखवून दिला.अँडरसन चे रिव्हर्स स्विंग त्याने चेंडूंच्या चमकणाऱ्या भागाच्या पोजीशन वरून छान ओळखले. कोणता बॉल आत येणार आणि कोणता बॉल सोडायचा हे त्याने सुरेख दाखवले.
इंग्लडच्या स्पिन्नर्सचे स्वतः चे कौशल्य किती आणि खराब झालेल्या खेळपट्टीचे किती हे ठणठ णीत खेळपट्टीवर पहिल्या दिवशी त्यांना गोलनदाजी करावी लागल्यास कळून येईल. रूट, स्टोक्स, अँडरसन,आर्चर यांना रोखणयाकरता भारतीय संघ व्यवस्थापन काय रणनीती आखते हे पहाणे इंटरेस्टिंग असेल. दुसरा सामना चेन्नईतच आहे. पहिल्या सामन्यात बॅटिंग आणि फास्ट बॉलिंग मध्ये इंग्लंड वरचढ ठरले.स्पिन बॉलर्स ना खेळपट्टीचा जास्त फायदा मिळाला.
तीन चार विभागात काम करावे लागणार आहे.त्या करता नवीन सैनिक लागणार आहेत.ह्याच सैनिकांनी मोहीम फत्ते होणार नाही.व्यवस्थापनाने लवचिक व्हायला हवे.होर्सेस फॉर कोर्सेस.