डॉ. वर्तिका नंदा : राजकुमार हिरानी यांचा नवीन चित्रपट संजु रिलीज होण्याआधीच चर्चेत आला आलेला आहे. कोणत्याही चित्रपटाचा प्रोमो तयार करताना त्यामागचा उद्देशट हा असतो की, प्रेक्षकांमध्ये तो चित्रपट पाहण्याची उत्सुकता असली पाहिजे. पण अनेक वेळेस चित्रपट रिलीज होण्याआधी वादाचा विषय होतो. संजु चित्रपटाच्या बाबतीत असंच काहीसं होतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकुमार हिराणी आणि विधू विनोद चोप्रा यांचा चित्रपट 'संजू'मध्ये संजय दत्तच्या विविध पैलूना उलगडवून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यात रणबीर कपूर मुख्य भूमिका साकारतोय. तीन भागात बनवलेल्या चित्रपटात संजय दत्तच्या खासगी आयुष्यातील सुरूवातीचे दिवस, ड्रग्सच्या आहारी जाणं, टाडा कायद्यांतर्गत जेलमध्ये जाणे यावर मुख्य प्रकाश टाकण्यात आला आहे.


सर्वात महत्वाची आणि लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे, संजय दत्त मुंबईच्या आर्थर रोड आणि नंतर पुण्यातील येरवडा जेलमध्ये होते. पण या संपूर्ण चित्रपटाचं शुटिंग भोपाळच्या खूप जुन्या जेलमध्ये झालं आहे. या तुरूंगात एकेकाळी शंकरदयाल शर्मा स्वातंत्र्य सैनिक म्हणून जेलभोगली आहे. राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी एक शिलेचं लोकार्पण केलं होतं, जी आजही त्यांच्या नावाने तिथे आहे. सध्या या तुरंगात कैद्यांना ठेवलं जात नाही. तर प्रशिक्षणासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था येथे केली जाते. याच जेलच्या बाहेर, येरवडा जेलचे कटआऊट लावून त्याला येरवडा जेलचं स्वरूप देण्यात आलं आहे. येथे आवर्जुन सांगावेस वाटते की, यासाठी जेलप्रशासनाला कोणतीही फी दिली गेलेली नाही.


चित्रपटाच्या प्रोमोवरून जो वाद सुरू झाला आहे, तो बऱ्याच अंशी चर्चेलायक दिसून येतो. या प्रोमोमध्ये संजय दत्त म्हणजेच रणधीर कपूरला तुरूंगात एका अंधारकोठडीत बसलेले दाखवलेलं आहे, जेथे घाणीचे साम्राज्य पसरलेलं आहे. संजय दत्त म्हणजेच रणवीर कपूर त्यावर ओरडून आपल्याला यातून सोडवा असं सांगतोय. सद्य परिस्थितीचा विचार करता मानवाधिकार आणि जेल अधिकाराच्या गोष्टी करणाऱ्या देशात सामान्यपणे असे घडणे सहजसोपे नाही. सुप्रीम कोर्ट बऱ्याच काळापासून देशातील १४०० कारागृहातील अमानवीय स्थितीवर चर्चा करीत आहे, आणि कारागृह चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत, आणि त्यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. परंतू सत्य हे आहे की, संजय दत्त ज्या काळात कारागृहात बंदीस्त होते, तेव्हासुद्धा एवढ्या मोठ्या नामांकित अभिनेत्याला तुरूंगातील कोठडीमध्ये अशा परिस्थितीचा सामना करावा लागेल, असं वाटत नाही.


पूर्ण चित्रपट पाहिल्याशिवाय या चित्रपटात दाखविले गेलेले दृश्य सत्य परिस्थितीतच्या किती जवळ आहेत, हे सांगणे कठीण आहे. परंतू या दरम्यान जेल सुधारकांनी सेन्सर बोर्डाला हे दृश्य काढून टाकण्याची मागणी केली आहे. साहजिकच अशा चित्रपटात तुरूंग ज्या प्रकारे दाखवले जातात, त्यावर पुन्हा चर्चा होणे गरजेचे आहे.


खरंतर कारागृह चित्रपटासाठी आणि संपूर्ण समाजासाठी उत्सुकतेचा विषय आहे. या प्रोमोवर जसा वाद सुरू झाला, काही चित्रपट निर्मात्यांनी सांगितले की, चित्रपटाचा उद्देश खरे किंवा खोट्याला मोठ्या स्तरावर दाखवणे हा असतो. ज्यामुळे सामान्य लोक त्याकडे आकर्षित होतील. याचाच अर्थ असा आहे की, एखादी लहान घटना मोठ्या पडद्यावर आणखी वाढवून चढवून कशी दाखवावी, त्यावर अनेक वेळा वाद होतात. जे विकेल तेच दिसेल, या धर्तीवर चित्रपटात बऱ्याचवेळा राईचा पर्वत करतात, आणि भ्रमाचा संसार उभा करतात. चित्रपट जोपर्यंत सामाजिक चैतन्य किंवा विकास यांच्याशी सक्रिय असतो, तोपर्यंत तो स्वीकार्य आणि सन्मानित असतो. परंतु जेव्हा ती खरेपणाच्या धाग्यात कल्पनेचे रंग भरायला लागतात. तेव्हा अनेक धोके निर्माण होतात. ही एक धोकायदायक परिस्थिती आहे. कारण हे चित्रपट पाहणाऱ्यांना अनेकवेळा खरेपणाची जाणीव नसते, त्यामुळे तो जे पाहतो, त्यालाच जीवनभर सत्य मानत राहतो.


चित्रपट निर्माते आणि लेखक यांना नेहमीच या गोष्टींचा विसर पडतो की, तुरुंग एक खूप संवेदनशील विषय आहे. तुरूंगाच्या आत मीडिया जात नाही की मीडिया. तुरूंगात ज्या झाडाझडती झाल्याच्या बातम्या येतात, त्या आधारावर खरेपणाची वेगवेगळी रूपं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. आजही जगात सर्वात जास्त चित्रपट भारतात तयार होतात आणि या चित्रपटांना समाजाचे चित्रण मानले जाते. परंतु जेव्हा चित्रपटात तुरूंगाला असंवेदनशीलपणे दाखवले जाते, तेव्हा त्यांचा मूळ उद्देश दूर सारला जातो. ज्यासाठी चित्रपटाची निर्मिती झालेली होती.


चित्रपटांच्या या दृश्यांवर संजय दत्त स्वत: खुलासा करतील, जर त्यांच्याबाबतीत असं काही घडलं असेल, तर वेगळी गोष्ट आहे, पण तसे झाले नसेल, तर अशा प्रकारची दृश्य दाखवून, ज्याचे नातेवाईक जेलमध्ये आहेत, त्यांचे मनोबल ख्ची करण्याचा हा प्रकार आहे, जे स्वत: नातेवाईकांच्या वास्तव्याची जागा पाहू शकत नाही. पण अशा दृश्यांना पाहून विचलित नक्कीच होवू शकतात. आपण अशा लोकांना नजर अंदाज करू शकतो? जे विनाअपराध जेलच्या बाहेर एक नको असलेली शिक्षा भोगत आहेत.


(डॉ. वर्तिका नंदा जेल सुधारक आहेत, त्यांनी आर्थररोड जेल, येरवडा जेल, आणि भोपाळमधील जुना जेल, या तीन जेलचा दौरा केलेला आहे. त्यांनी देशातील १३८२ जेलमधील अमानवीय स्थितीशी संबंधित सुप्रीम कोर्टातील याचिकेच्या सुनावणीचा त्या एक भाग आहेत. न्याय, एम बी, लैंकूर, आणि न्याय. दीपक गुप्ता यांच्या बेंचने महिलांच्या आणि मुलांच्या आकलन प्रक्रियेत त्यांना सहभागी केलेलं आहे. जेलवरील एक वेगळी मालिका तिनका तिनकाच्या त्या संस्थापिका आहेत. काही उल्लेखनीय कार्यासाठी भारताचे राष्ट्रपती यांचेमार्फत, त्यांना स्त्री शक्ती पुरास्काराने सन्मानित करण्यात आले आहे.)