श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये झालेल्या घटनेनंतर संपूर्ण देशामध्ये संतापाचं वातावरण आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे. यावर देशभरातून प्रतिक्रया उमटत आहेत. सोशल मीडियावर प्रतिक्रिया वाढू लागल्या आहेत. यातच मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीने देखील प्रतिक्रिया दिली आहे.


काय आहे घटना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१० जानेवारी रोजी आठ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी आठ लोकांविरुद्ध चार्जशीट दाखल केली आहे. ९ एप्रिल रोजी कठुआच्या न्यायालयात सादर करण्यात आलेल्या १५ पानांच्या चार्जशीटमध्ये या घटनेचा मास्टरमाईंड म्हणून रिटायर्ड महसूल अधिकारी संजी राम याचं नाव लिहिण्यात आलंय. दुसरीकडे, या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणीसाठी जम्मू हायकोर्ट बार असोसिएशननं बुधवारी जम्मू बंदचं आवाहन केलं होतं.


चार्जशीट दाखल केल्यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि हत्याचा आरोपी संजीराम, त्याचा मुलगा विशाल आणि भाच्याला अटक केलीय. या प्रकरणाच्या चौकशी निगडीत विशेष पोलीस अधिकारी दीपक खजूरिया, सुरिंदर कुमार, प्रवेश कुमार, सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर आणि हेड कॉन्स्टेबल तिलक राज यांना पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.