PHOTO : 92 वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये 'या' चित्रपटात करण्यात आला होता पहिला लिपलॉक; KISS असल्यामुळे झाली बॅन, तरी ठरली आइकॉनिक

Entertainment : आजचे बॉलिवूड चित्रपट असो किंवा वेब सीरिज हे किसिंग सीन्स आणि रोमान्स शिवाय पूर्णच होत नाहीत. पण तुम्हाला माहितीये बॉलिवूडमध्ये सगळ्यात पहिले कोणत्या चित्रपटात लिपलॉक करण्यात आला आणि तोही 4 मिनिटांसाठी?   

| Jan 04, 2025, 18:16 PM IST
1/7

बॉलिवूड चित्रपट असो किंवा वेब सीरिज, मालिका यात किसिंग सीन्स आणि इंटिमेट सीन्सचा भडीमार असतो. पण तुम्हाला माहित आहे का की बॉलिवूडमधला पहिला चित्रपट कोणता होता ज्यामध्ये पहिल्यांदा किसिंग सीन चित्रित करण्यात आला होता? या दृश्यामुळे बराच गदारोळ झाला होता. 

2/7

खरं तर, हा ऑनस्क्रीन किस 92 वर्षांपूर्वी झाला होता आणि हा लिपलॉक क्षण 4 मिनिटांचा चित्रित करण्यात आला होता. 

3/7

आम्ही जा चित्रपटाबद्दल बोलत आहोत, त्याच नाव आहे कर्मा. हा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट होता ज्यात किसिंग सीन होता.   

4/7

देविका राणी आणि तिचा पती हिमांशू राय त्यात होते आणि त्यांच्यामध्ये हा किसिंग सीन चित्रित करण्यात आला होता. राय यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून यात देविका मुख्य भूमिकेत दिसली होती. 

5/7

दोघेही पती-पत्नी होते, त्यामुळे त्यांच्यासाठी गोष्टी जरा सोप्या होत्या. ज्या काळात खेड्यापाड्यातील साधेपणा इंडस्ट्रीत दाखवला जात होता, त्या काळात असा सीन दाखवल्यावर चित्रपटाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

6/7

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1933 मध्ये देविका राणीचा 'कर्मा' हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याच्या चार मिनिटांच्या किसिंग सीनवर बराच वाद झाला होता आणि त्यामुळे भारतात त्यावर बंदी घालण्यात आली होती. 

7/7

कर्मा 1933 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, मात्र भारतात बंदीमुळे आणि दृश्यांमुळे तो फ्लॉप ठरला. मात्र, त्याला परदेशात प्रचंड प्रतिसाद मिळाला. जसजसा वेळ निघून गेला तसतसा या चित्रपटाने लोकांमध्ये खूप लोकप्रियता मिळवली.