नागपुर: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज दुपारी १.३० वाजता सुरु होणार आहे. हा सामना वीसीए स्टेडिअम, जामठा येथे खेळला जाणार आहे. आजपर्यंत जामठा येथे भारतीय संघाचे ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३ सामने झाले आहेत. या मैदानात भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकही सामना गमवला नाही. या मैदानात अनेकांनी विक्रम नोंदवले आहेत. म्हणूनच या मैदानाला विक्रमाचे मैदान म्हणून ओळखले जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


वीसीए स्टेडिअमवरील १० म्हत्त्वाचे विक्रम 


 


१) भारताने या मैदानात एकूण ५ सामने खेळले आहेत. त्यापैकी ३ सामने ऑस्ट्रेलिया आणि १ सामना दक्षिण अफ्रीका तर १ सामना श्रीलंकेसोबत खेळला आहे. महत्त्वाचे म्हणजे भारताने हे पाचही सामने जिंकले आहेत.


२)ऑस्ट्रेलिया ने या मैदानात एकूण ४ सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलिया संघाला ३ सामन्यात भारताकडून हार स्वीकारावी लागली. मात्र, एका सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्युझीलंडच्या संघाला चीत केले आहे.


३) नागपूरच्या या स्टेडिअमवर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम महेंद्र सिंह धोनी याच्या नावावर आहे. त्याने ५ सामन्यात १३४च्या सरासरीने २६८ धावा केल्या आहेत. तसेच भारताचा कर्णधार विराट कोहली २०९ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.


४) या मैदानात मोठी धावसंख्या करणाच्या विक्रम ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जार्ज बेली याच्या नावावर आहे. त्याने २०१३ मध्ये भारताच्या विरुद्ध १५६ धावांचा पल्ला गाठला होता. परंतु हा सामना ऑस्टेलिया संघाने गमवला होता.


५) सर्वाधिक शतक विक्रमाच्या बाबतीत महेंद्र सिंह धोनी पहिल्या स्थानावर आहे. त्याने या मैदानात २ शतक केले आहेत. विराट कोहली, सचिन तेंडुलकर, शिखर धवन, जार्ज बेली, शेन वॉटसन, तिलकरत्ने दिलशान यांनी १ शतकाचे विक्रम केले आहेत. 


६) या मैदानात सर्वात मोठा धावसंख्या भारतीय संघाने उभारली आहे. भारताने २००९ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३५४ रन केले होते. तसेच, भारताने हा सामना ९९ धावांनी जिंकला होता.


७) या मैदानाला 'हायस्कोरींग ग्राउड' संबोधलं जाते. या मैदानात सर्वात कमी धावसंख्या करणारा कॅनडा एकमेव संघ ठरला आहे. कॅनडाच्या संघ २०११ साली १२३ धावांवर गार झाला होता.


८) ऑस्टेलिया संघाचे गोलंदाड मिचेल जॉनसन याने सर्वात जास्त विकेट मिळवले आहेत. त्याने या मैदानात ३ सामन्यात सर्वाधिक ९ विकेट घेतले आहेत. तसेच या मैदानात डेल स्टेन, हरभजन सिंह, रवींद्र जडेजा, यांनी प्रत्येकी ५ विकेट घेतले आहेत. 


९) रोहित शर्माने या मैदानात सर्वाधिक ८ षटकार लगावले आहेत. जार्ज बेली आणि महेंद्र सिंह धोनी यांनी प्रत्येकी ५ षटकार लगावले आहेत. त्यानंतर ४ षटकाराच्या यादीत सुरेश रैना, शेन वॉटसन यांचा समावेश आहे.


१०) नागपूरच्या वीसीए स्टेडिअमवर सर्वाधिक धावसंख्येने विजय मिळवण्याचा विक्रम झिम्बाब्वे संघाच्या नावावर आहे. २०११ साली झिम्बाब्वे संघाने कॅनडा संघाला १७५ धावसंख्येने मात दिली होती.