चेन्नई : भारतीय यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कारकीर्दीतील १०० वे अर्धशतक झळकावलं. या रेकॉर्डमुळे तो आता सचिन, द्रविड, गांगुली या दिग्गजांच्या पंगतीत जाऊन बसला आहे. धोनीने आपल्या अर्धशतकांचे सतक साजरे केले आहे. 



आतापर्यंत भारतातर्फे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (१६४), राहुल द्रविड (१४५) आणि सौरव गांगुली (१०६) या दिगज्ज भारतीयांनी यापूर्वी अशी कामगिरी केली आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतकांच शतक साजरं करणारा धोनी दुसरा यष्टिरक्षक ठरला. यापूर्वी श्रीलंकेच्या कुमार संगकाराने अर्धशतकांची शंभरी गाठली आहे.
यष्टीमागे बहारदार कामगिरी करणाऱ्या धोनीने मधल्या फळीत येऊन नेहमीप्रमाणे टीमला विजयी पथावर नेऊन ठेवले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेत भारताची अवस्था ४ बाद ७९ अशी असताना धोनीने हार्दिक पांड्याच्या साथीने चमकदार कामगिरी केली.