आयपीएल टीमच्या मालकांमध्ये कोण आहे सर्वात गरीब? कोणाकडे किती संपत्ती?

इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी मेगा ऑक्शन 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी पार पाडणार आहे. आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगपैकी एक असून यातून दरवर्षी भारतीय आणि विदेशातील अनेक खेळाडू मोठी कमाई करतात. आयपीएलमध्ये सध्या एकूण १० संघानी सहभाग घेतला असून अनेक संघांचे मालक हे मोठे उद्योगपती तसेच बॉलिवूड सुपरस्टार आहेत. तेव्हा 10 संघांपैकी कोणत्या संघाचे मालक जास्त श्रीमंत आहेत, तसेच त्यांच्या संपत्तीबाबत जाणून घेऊयात. 

| Nov 16, 2024, 18:42 PM IST
1/10

मुंबई इंडियन्स :

आयपीएलमधील मुंबई इंडियन्स ही सर्वात यशस्वी टीमपैकी एक असून त्यांनी तब्बल 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. यासह मुंबई इंडियन्सची मालकीण नीता अंबानी या आयपीएल टीमच्या मालकांमध्ये सर्वात श्रीमंत आहेत. नीता अंबानींनकडे जवळपास 23,199 कोटींची संपत्ती आहे. 

2/10

चेन्नई सुपरकिंग्स :

चेन्नई सुपरकिंग्सचे मालक एन श्रीनिवासन हे आयपीएल टीमच्या श्रीमंत मालकांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. एन श्रीनिवासन हे इंडिया सीमेंट्सचे मालक असून 5 वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्सची ब्रँड व्हॅल्यू 8,811 कोटी रुपये आहे. एन श्रीनिवासन यांची एकूण संपत्ती ही सुमारे 720 कोटी रुपये आहे.  

3/10

कोलकाता नाइट राइडर्स :

शाहरुख खान हा कोलकाता नाइट राइडर्स संघाचा मालक आहे. यासह अभिनेत्री जुही चावला आणि जय मेहता हे सुद्धा केकेआरमध्ये भागीदार आहेत. या संघाची ब्रँड व्हॅल्यू 8,428 कोटी इतकी असून शाहरुख खानची नेटवर्थ जवळपास 6000 कोटी इतकी आहे.  

4/10

सनराइजर्स हैदराबाद :

 सनराइजर्स हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन हिचे वडील कलानिथि मारन हे सन ग्रुपचे फाउंडर असून काव्याची एकूण संपत्ती ही जवळपास 409 कोटी रुपये आहे. तर सनरायजर्स हैदराबाद या संघाची ब्रँड व्हॅल्यू 7,432 कोटी रुपये आहे. 

5/10

दिल्ली कॅपिटल्स :

जीएमआर ग्रुप आणि जेएसडब्ल्यू ग्रुप हे दिल्ली कॅपिटल्सचे सह मालक आहेत. दिल्ली कॅपिटल्सचे चेअरपर्सन पार्थ जिंदल असून यांची एकूण संपत्ती जवळपास 600 कोटी आहे. तर दिल्ली कॅपिटल्सची ब्रँड व्हॅल्यू 7,930 कोटी रुपये आहे. 

6/10

राजस्थान रॉयल्स :

रॉयल मल्टी स्पोर्ट्स प्राइवेट लिमिटेडकडे राजस्थान रॉयल्सचा मालकी हक्क आहे. या संघाचे मालक मनोज बडाले आणि लचलान मर्डोक हे असून मनोज बडाले यांची संपत्ती 160 मिलियन डॉलर असून राजस्थान रॉयल्सची ब्रँड व्हॅल्यू ही सुमारे 7,662 कोटी रुपये आहे. 

7/10

पंजाब किंग्स :

अभिनेत्री प्रीति झिंटा सह पंजाब किंग्स या आयपीएल संघामध्ये मोहित बर्मन, नेस वाडिया आणि करण पाल हे सुद्धा सहमालक आहेत. पंजाब किंग्सची ब्रँड व्हॅल्यू 7,087 कोटी रुपये असून प्रीति झिंटाची एकूण संपत्ती ही सुमारे  183 कोटी रुपये आहे. 

8/10

लखनऊ सुपर जाएंट्स :

लखनऊ सुपर जाएंट्सचा मालकी हक्क हा आरपीएसजी वेंचर्स लिमिटेड यांच्याकडे असून या कंपनीचे मालक उद्योगपती संजीव गोयनका हे आहेत. त्यांची नेटवर्थ जवळपास 16,800 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. लखनऊ संघाची ब्रँड व्हॅल्यू 8,236 कोटी रुपये आहे.   

9/10

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू :

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची मालकी यूनाइटेड स्पिरिट्स लिमिटेडकडे आहे. या संघाची ब्रँड व्हॅल्यू जवळपास 7,853 कोटी रुपये आहे. 

10/10

गुजरात टायटन्स :

गुजरात टायटन्स हा सीवीसी कॅपिटल्सच्या मालकीचा संघ आहे. या कंपनीचे मालक स्टीव कोल्ट्स आणि डोनाल्ड मॅनजी  आहे. या संघाची ब्रँड व्हॅल्यू सुमारे  6,512 कोटी रुपये आहे.