Asia Cup 2023, Afghanistan Team : अफगानिस्तान क्रिकेट बोर्ड (Afghanistan Cricket Board) म्हणजे एबीसीने नुकतंच आशिया कपसाठीच्या टीमची घोषणा केली आहे. येत्या 30 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप स्पर्धेसाठी (Asia Cup 2023) 17 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. वर्ल्ड कपपूर्वीची लिटमस टेस्ट म्हणून आशिया कपकडे पाहिलं जात आहे. 17 सप्टेंबरला अखेरचा सामना खेळला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ फायनल खेळतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, आता या चर्चा बंद होताना दिसत आहेत. त्याला कारण ठरलंय अफगाणिस्तानची टीम. अफगाणिस्तानची टीमसमोर आता पाकिस्तानची निभाव लागलं अवघड झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशिया कपसाठी अफगाणिस्तानची टीम (Afghanistan’s squad for Asia Cup 2023) जाहीर झाली आहे. या संघात अष्टपैलू करीम जनातचे (Karim Janat) पुनरागमन झालंय. 25 वर्षीय जनातने फेब्रुवारीमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. त्याआधी तो 2017 मध्ये खेळताना दिसला होता. त्याचबरोबर धोनीचा 18 वर्ष जुना रेकॉर्ड मोडणाऱ्या रहमानउल्ला गुरबाजला (Rahmanullah Gurbaz) देखील संघात स्थान देण्यात आलं आहे. वयाच्या 21 व्या वर्षी 5 एकदिवसीय शतकं झळकावून गुरबाज या वयात अधिक शतके करणारा खेळाडू बनला होता. आता तो आगामी आशिया कप स्पर्धेत ताकद दाखणार आहे.


आशिया कप 2023 साठी अफगाणिस्तानचा संघ


हशमतुल्ला शाहिदी (C), इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमानउल्ला गुरबाज (WC), नजीबुल्ला झदरन, राशीद खान, इक्रम अली खिल, करीम जनात, गुलबद्दीन नायब, मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी, शराफुद्दीन अश्रफ, नूर अहमद, अब्दुल रहमान, मोहम्मद सलीम.



एशिया कप 2023 का शेड्यूल


३० ऑगस्ट: पाकिस्तान विरुद्ध नेपाल, मुल्तान
३१ ऑगस्ट: बांग्लादेश वि श्रीलंका, कैंडी
2 सप्टेंबर: पाकिस्तान वि भारत, कॅंडी
4 सप्टेंबर: भारत वि नेपाल, कॅंडी
5 सप्टेंबर: अफगानिस्तान Vs श्रीलंका, लाहौर


सुपर-4


६ सप्टेंबर: ए१ वि बी२, लाहौर
९ सप्टेंबर: बी१ वि बी२, कोलंबो
10 सप्टेंबर: ए1 वि ए2, कोलंबो
12 सप्टेंबर: ए2 वि बी1, कोलंबो
14 सप्टेंबर: ए1 वि बी1, कोलंबो
15 सप्टेंबर: ए2 वि बी2, कोलंबो


17 सप्टेंबर: फाइनल, कोलंबो


आशिया कपसाठी टीम इंडिया 


रोहित शर्मा (C), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.