`या` क्रिकेटरच्या घरी आली `नन्ही परी`
भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूला `कन्यारत्न`
नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यादरम्यान भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे बाबा झाला आहे. सोशल मीडियावरुन ही गोड बातमी समोर आली आहे. अजिंक्यची पत्नी राधिका रहाणेने शनिवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला.
यावर्षी जुलै महिन्यात अजिंक्य रहाणेने तो बाबा होणार असल्याचं सोशल मीडियावर सांगितलं होतं.
अंजिक्य रहाणेने 2014 मध्ये लहाणपणाची मैत्रीण आणि शेजारी राहणारी राधिका धोपावकरसोबत विवाह केला होता.