नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरूवारी खेळाडूंसाठी नवीन कराराची घोषणा केली आहे. बीसीसीआयने नवीन कराराप्रमाणे 'ए प्लस' श्रेणीमध्ये केवळ तीन खेळाडूंचा समावेश आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही 'ए ग्रेड'मध्ये ठेवण्यात आले आहे. या 'ए ग्रेड' खेळाडूंचे करार शुल्क वर्षाला ७ करोड इतके आहे. बीसीसीआयने पुरुष आणि महिला दोन्ही टीमचे वार्षिक करार शुल्क जाहीर केले. परंतु पुरुषांना मिळणाऱ्या मानधनापेक्षा महिलांना दिले जाणारे मानधन अतिशय कमी असल्याचे यातून समोर येत आहे. 



'ए ग्रेड' श्रेणीतील खेळाडू 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षी 'ए प्लस' श्रेणीत असलेल्या शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमारला यंदाच्या वर्षात 'ए ग्रेड' देण्यात आली आहे. 'ए ग्रेड' खेळाडूंचे वार्षिक करार शुल्क ५ करोड रूपये आहे. गोलंदाज ऋषभ पंतने केलेल्या दमदार खेळीने त्याने ए ग्रेडमध्ये स्थान मिळवले आहे. महेंद्र सिंह धोनी, चेतेश्वर पुजारा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेडा, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी यांनाही 'ए ग्रेड' देण्यात आली आहे. 


हार्दिक पांड्या आणि के एल. राहुल यांना 'बी ग्रेड'मध्ये स्थान देण्यात आले आहे. तर दिनेश कार्तिक आणि ऋद्धिमान साहा यांना 'सी ग्रेड'मध्ये जागा देण्यात आली आहे. 





महिला टीमचा करार 


बीसीसीआयने पुरुष टीमसह महिला टीमसाठीही करार शुल्क जाहीर केले आहे. महिला क्रिकेट टीममध्ये मिताली राज, हरमनप्रीत कौर, स्मृती मंदाना, पूनम यादव यांना ग्रेड 'ए श्रेणी'त स्थान देण्यात आले आहे. 


एकता बिष्ट, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, दीप्ती शर्मा, जेमिमाह यांना बी ग्रेड देण्यात आली आहे. तर राधा यादव, हेमलता, अनुजा पाटील, वी. कृष्णामूर्ति, मानसी जोशी, पूनम राऊत, मोना, अरुंधति रेड्डी, राजेश्वरी गायकवाड, तान्या भाटिया आणि पूजा यांना 'ग्रेड सी' श्रेणी देण्यात आली आहे. 


महिला क्रिकेटमध्ये ए ग्रेड खेळाडूंना ५० लाख, बी ग्रेड खेळाडूंना ३० लाख तर ग्रेड सी खेळाडूंना १० लाख रूपये देण्यात येणार आहेत.