नवी दिल्ली : आयपीएल दरम्यान धोनीची निंदा करणाऱ्या हर्ष गोयंकाला धोनीच्या फॅन्सच्या टीकेचा धनी व्हायला लागले होते.
दरम्यान टीम इंडियकडून ३४ वन डे खेळलेल्या ३१ वर्षाच्या अंबाति रायडूनेही हर्ष गोयंकाला उद्देशून एक ट्वीट केले होते. 'ग्रेट नॉक धोनी, कोणी गोयंकाला आरसा गिफ्ट करेल का ?' असे त्याने त्यात म्हटले होते.
पण तेव्हा रायडूला माहित नव्हते की त्याचे ट्वीट काही महिन्यांनी त्याची खिल्ली उडविण्यासाठीच वापरले जाईल. रायडूचा कार अपघात आणि मारहाण प्रकरणाची गोयंकाने खिल्ली उडविली आहे. 'ग्रेट नॉक अंबाति रायडू, कोणी यांना आरसा गिफ्ट करेल का ?' असे गोयंकाने ट्वीटमध्ये म्हटले आहे. 


एका वृद्धासोबत काही दिवसांपूर रायडूची बाचाबाची झाली होती. त्यानंतर रायडूचे स्वत: वरचे नियंत्रण सुटले व त्याने मारामारी केली. कोणीतरी याप्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर रायडूवर टीका झाली.