PHOTO : 11 वर्ष मोठ्या दिग्दर्शकाशी लग्न, 4 वर्षांनी घटस्फोट, मग आला परदेशी प्रियकर, लग्न न करता अभिनेत्री झाली आई

Entertainment : भारतीय चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यापैकी अनेकांनी आपल्या सहकलाकारांच्या प्रेमात पडून लग्नही केलं. असे काही आहेत ज्यांचे चित्रपट दिग्दर्शकासोबत नातेसंबंध देखील जुळले. आज आम्ही अशा अभिनेत्रीबद्दल बोलतोय जिने 11 वर्ष मोठ्या दिग्दर्शकाशी लग्न केलं खरं पण 4 वर्षांमध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर लग्न न करता तिने बाळाला जन्म दिला.

| Jan 09, 2025, 22:19 PM IST
1/9

खरं तर, आम्ही इथे 'ये जवानी है दिवानी' चित्रपटात काम केलेल्या कल्की कोचलिनबद्दल बोलत आहोत. तिचा 10 जानेवारीला 41 वा वाढदिवस साजरा करणार आहे. बहुतेक चित्रपटांमध्ये कल्की सहाय्यक भूमिकेत दिसत आहे. मात्र तिचा अभिनय लोकांना खूप आवडतो.

2/9

कल्की कोचलिन ही एक फ्रेंच अभिनेत्री आणि लेखिका आहे. पण तिचा जन्म भारतातील पाँडिचेरी इथे झाला. आधुनिक जीवनशैलीसाठी अभिनेत्री प्रसिद्ध आहे. तिने तिच्या कौशल्यांसाठी एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, एक फिल्मफेअर पुरस्कार आणि दोन स्क्रीन पुरस्कार जिंकले आहेत. फ्रेंच नागरिक असूनही, ती भारतातच लहानाची मोठी झाली. 

3/9

कल्कीला लहानपणापासूनच थिएटरचे आकर्षण होतं. तिने गोल्ड स्मिथ्स, लंडन विद्यापीठात नाटकाचा अभ्यास केला आणि स्थानिक थिएटर कंपनीमध्येही काम केलं. भारतात परतल्यानंतर, तिने चंदा या ब्लॅक कॉमेडी-ड्रामा Dev.D (2009) मधून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि तिच्या अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

4/9

कल्कीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर रोमँटिक कॉमेडी-ड्रामा जिंदगी ना मिलेगी दोबारा (2011) आणि ये जवानी है दिवानी (2013), ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. कल्कीने क्राईम थ्रिलर द गर्ल इन येलो बूट्स (2011) सह स्क्रिप्ट रायटिंगमध्ये तिची कारकीर्द वाढवली, ज्यामध्ये तिने मुख्य भूमिका देखील केली होती.

5/9

मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ (2014) या नाटकामध्ये सेरेब्रल पाल्सी ग्रस्त तरुणीच्या चित्रणासाठी कोल्कला उच्च प्रशंसा आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, विशेष ज्युरी पुरस्कार जिंकलाय. केल्कीने अनेक यशस्वी वेब सिरीजमध्ये काम केलं. अमेझॉन प्राइम व्हिडीओच्या मेड इन हेवन या रोमँटिक ड्रामामध्ये एकाकी सोशलाईट आणि Netflix च्या क्राइम थ्रिलर सेक्रेड गेम्स (2019) मधील स्वयंघोषित गॉडवूमनच्या भूमिकेबद्दल तिने प्रशंसा मिळवली.

6/9

आता अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, तिने 2011 मध्ये प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपशी लग्न केलं. पण हे लग्न 4 वर्षांपर्यंत टिकलं. दोघांच्या वयात 11 वर्षांचा फरक होता.

7/9

अनुराग कश्यप आणि कल्की यांच्या घटस्फोटाचे खरं कारण काय आहे याबद्दल फारसे अपडेट नाही. पण असं म्हटलं जातं की बेवफाईच्या अफवांमुळे त्यांच्या नात्यात तणाव वाढला, त्यामुळे त्यांना वेगळे होण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यांचं लग्न संपुष्टात आलं असलं तरी कल्की आणि अनुराग एकमेकांचा आदर करतात.

8/9

अनुराग कश्यपपासून घटस्फोट घेतल्यानंतर कल्की हर्षबर्गला भेटली जो तिचा सध्याचा प्रियकर आहे. कल्कीला हर्षबर्गला एक मुलगी देखील आहे जिचा जन्म 2020 मध्ये झाला होता.  दोघांचेही एकमेकांशी चांगले बॉन्डिंग असल्याने त्यांनी लग्न न करताच पालक होण्याचा निर्णय घेतला.

9/9

कल्कीच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर ती 140 कोटींचा घरात आहे. कल्की अभिनयाशिवाय  तिची स्वतःची थिएटर कंपनी, लिटिल प्रॉडक्शन देखील चालवते.