नवी दिल्ली : आयपीएल २०२० संपली असून सर्व खेळाडू दुबईतून मायदेशी परतू लागले आहेत. मुंबई इंडीयन्सचे (Mumbai Indians)चे स्टार क्रिकेटर कृणाल पांड्या देखील मुंबईत परतत होता. पण त्याला मुंबई एअरपोर्टवर थांबवल गेलं. डिपार्टमेंट ऑफ रेवेन्यू इंटेलीजेंस (डीआरआय) ने त्याच्यावर कथित पद्धतीने जास्त सोने आणि इतर मौल्यवान वस्तू ठेवण्याचा आरोप लावत दंड लावला आहे. क्रिकेटर्सना संध्याकाळी ५ वाजता विमानतळावर थांबवले गेल्याची माहीती अधिकाऱ्यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मर्यादीत क्षमतेपेक्षा जास्त सोनं बाळगल्याची आपली चूक पांड्याने मान्य केली. आपल्याला नियमांबद्दल माहिती नव्हती असे सांगत त्याने माफी मागत दंड भरला. कृणाल पांड्याकडे मिळालेल्या सामानात सोन्याच्या दोन बांगड्या आणि महागडी घड्याळ होती. 


आयपीएल २०२० संपली असून सर्व खेळाडू दुबईतून मायदेशी परतू लागले आहेत. मुंबई इंडीयन्सचे (Mumbai Indians)चे स्टार क्रिकेटर कृणाल पांड्या देखील मुंबईत परतत होता. पण त्याला मुंबई एअरपोर्टवर थांबवल गेलं. डिपार्टमेंट ऑफ रेवेन्यू इंटेलीजेंस (डीआरआय) ने त्याच्यावर कथित पद्धतीने जास्त सोने आणि इतर मौल्यवान वस्तू ठेवण्याचा आरोप लावत दंड लावला आहे. क्रिकेटर्सना संध्याकाळी ५ वाजता विमानतळावर थांबवले गेल्याची माहीती अधिकाऱ्यांनी दिली.


जर तुम्ही विदेशातून सोनं खरेदी करत असाल तर पावती तुमच्या जवळ ठेवा. ती पावती तुम्हा कस्टम आणि एजन्सींकडून झालेल्या चौकशीवेळी मदत करेल. यामुळे सोन्याची किंमत देखील सहज लक्षात येईल.