मुंबई : ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा टेस्ट सिरीज जिंकल्यानंतर भारतीय टीम लागोपाठ तिसऱ्या वर्षी आयसीसी टेस्ट चॅम्पियन बनली आहे. भारतीय टीमला आयसीसीकडून बक्षीस म्हणून १० लाख डॉलर (६.९२ कोटी) देण्यात येणार आहे. भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली याने म्हंटलं की, 'आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप मेस पुन्हा एकदा आपल्याकडेच ठेवताना गौरव वाटत आहे. आमची टीम वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. पण टेस्टमध्ये पहिल्या स्थानावर राहणं आमच्यासाठी अधिक आनंदाची गोष्ट आहे.' भारतीय टीमनंतर न्यूझीलंडची टीम दुसऱ्या स्थानावर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोहलीने पुढे म्हटलं की, 'भारतीय टीम यावर्षी होणाऱ्या आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतही चांगली कामगिरी करेल अशी मला आशा आहे. आम्हाला याची प्रतिक्षा आहे. कारण यामुळे टेस्ट सिरीजचं महत्त्व वाढेल.'


न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने म्हटलं की, 'टेस्ट रँकिंगमध्ये दुसरं स्थान मिळवणं एक शानदार यश आहे. एक टीम म्हणून मला याचा गौरव आहे. हे फक्त ११ खेळाडूंमुळे नाही तर संपूर्ण टीम आणि इतर स्टाफमुळे शक्य होतं.'


आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनु साहनी यांनी भारतीय टीमला शुभेच्छा देत टेस्ट क्रिकेटचं महत्त्व सांगितलं. वर्ल्डकप नंतर ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुरु होण्याची वाट पाहत आहेत.'