आरसीबीची कोलकाता नाईट रायडर्सवर ८२ रन्सनी मात
रॉयल चॅंलेजर्सच्या माऱ्यापुढे कोलकाताच्या बॅट्समन्सनी टाकली नांगी
शारजाह : १९५ रन्सचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेली कोलाकाता नाईट रायडर्सची टीम केवळ ११२ रन्स करु शकली. त्यामुळे बंगळूरने कोलकाता नाईट रायडर्सवर ८२ रन्सनी मात केली. रॉयल चॅंलेजर्स बॅंगलोरच्या माऱ्यापुढे कोलकाताच्या बॅट्समन्सनी नांगी टाकली. १२ ओव्हर्सनंतर कोलकाताचा स्कोअरबोर्ड ६९ वर ५ विकेट असा होता. दिनेश कार्तिक केवळ १ रन्स करु शकला. शुभनम गिल ३४ रन्स बनवून आऊट झाला. टॉम बेटन ८ रन्सवर तर नितीश राणा ९ रन्सवर आऊट झाला. अशा प्रकारे कोलाकाताची बॅट्समन्सची फळी एकामागोमाग एक पव्हेलियनमध्ये गेली. १६ ओव्हर्सनंतर नाईट रायडर्सची स्थिती ९५ धावांवर ७ विकेट्स अशी होती. १८ ओव्हरनंतर रायडर्स १०४ वर ८ विकेट अशी स्थिती झाली.
१९५ रन्सचं आव्हान
आयपीएल १३ मधील २८ वी मॅच रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये खेळली जात आहे. बंगलोरने रायडर्सना २० ओव्हरमध्ये १९५ रन्सचे लक्ष्य दिले. बंगलोरच्या एबी डीव्हीलीअर्सने नाबाद ७३ रन्स केले. ३३ बॉलमध्ये ५ फोर आणि ६ सिक्सर्सच्या मदतीने खेळी केली. एबीच्या विस्फोटक खेळीमुळे आरसीबी दोन विकेटच्या बदल्यात १९४ रन्स पर्यंत पोहोचली.
बंगळूरचा फलंदाज एरोन फिंचला कोलकाताचा फास्ट बॉलर प्रसिद्ध कृष्णाने ४७ रन्सवर बोल्ड केलं.