दुबई : आयपील २०२० मधील सनराइझर हैदराबाद आणि चेन्नई सुपरकिंग्जमधील दुसऱ्या सामन्यात चेन्नईने बाजी मारली. चेन्नईने हैदराबादवर २० रन्सनी मात केलीय. चेन्नईचे १६८ रन्सचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादला २० ओव्हरमध्ये ८ विकेट्सच्या बदल्यात १४७ रन्स बनवता आल्या. हैदराबादच्या केएन विल्यम्सने सर्वाधिक ५७ रन्स बनवले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई सुपकिंग्जने २० ओव्हरमध्ये ६ विकेट्सच्या बदल्यात १६७ रन्स केले. सनरायझर्स हैदराबादला जिंकण्यासाठी १६८ रन्सचे आव्हान दिले. चेन्नईकडून वॉटसनने ४२ आणि रायडूने ४१ रन्स बनवले. याशिवाय जडेजाने २५ तर धोनीने २१ रन्सची खेळी केली. 



आयपीएलबद्दल बोलायच झालं तर चेन्नई आणि सनरायझर्समध्ये आतापर्यंत १३ सामने झाले आहेत. चेन्नईने ९ तर हैदराबादने ४ सामने जिंकले आहेत. याआधीच्या मॅचमध्ये धोनीच्या टीम हैदराबादकडून ७ रन्सनी हरली होती.  मनीष पांडे ४ रन्सवर तर वॉर्नर ९ रन्सवर आऊट झाला.