दुबई : आयपीएल २०२० मध्ये सनराईज हैदराबाद आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पुन्हा एकदा सामना सुरु आहे. डेविड वॉर्नरच्या साथीने हैदराबादची टीम सीएसकेविरुद्ध विजय मिळवण्याचा प्रयत्न करतेय. सर्वांचे लक्ष्य डेविड वॉर्नरवरच्या बॅटींगवर असणार आहे. वॉर्नरची बॅट या सिझनमध्ये चांगलीच तळपताना दिसतेय. अशातच वॉर्नरने चेन्नईविरोधात १९ रन्स केल्यानंतर आयपीएलच्या इतिहासात त्याची नोंद होणार आहे.


५ हजार रन्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेविड वॉर्नर आयपीएलचा सर्वात यशस्वी फलंदाज राहीला आहे. जगातील सर्वात मोठ्या टी २० लीगमध्ये वॉर्नर यशस्वी विदेशी फलंदाज आहे. आयपीएलमधील आपला धावफलक उंचावण्यासाठी वॉर्नरचे लक्ष्य आज ५ हजार रन्सवर आहे. 



५ हजारचा टप्पा पार करणारा वॉर्नर चौथा बॅट्समन होणार आहे. आयपीएलमध्ये सर्वात जास्त रन्स विराट कोहलीच्या नावावर आहेत. कोहलीने टुर्नामेंटमध्ये ५,६६८ रन्स बनवले आहेत.


मोठे रेकॉर्ड 


वॉर्नर हा आयपीएलमधील यशस्वी ओपनर आहे. वॉर्नरने ऑरेंज कॅप सर्वाधिक तीन वेळा जिंकली आहे. २०१५, २०१७ आणि २०१९ मध्ये वॉर्नरने हे यश मिळवलं. या लीगमध्ये सर्वाधिक ४६ फिफ्टी वॉर्नरच्या नावावर आहेत.