सुनील ग्रोवरच्या पुनरागमनावर कपिल शर्माने सोडले मौन
कपिल शर्माने फेसबूक लाइव्हमध्ये सुनील ग्रोवरच्या पुनरागमनावर मौन सोडले.
मुंबई : कपिल शर्माने फेसबूक लाइव्हमध्ये सुनील ग्रोवरच्या पुनरागमनावर मौन सोडले.
कपिलने ९ जुलैला आपल्या फेसबूक पेजवर फॅन्सला सांगितले की १० जुलैला आपल्या फिरंगी चित्रपटाचे शुटिंग संपल्यावर लाइव्ह चॅट करणार त्यानुसार तो फेसबूकवर लाइव्ह आला होता. त्यावेळी फॅन्सने अनेक प्रश्न विचारले. यावेळी फॅन्सने सुनील ग्रोवर पुन्हा शोमध्ये कधी येणार असा प्रश्न विचारला.
फॅन्सच्या प्रश्नावर कपिल म्हणाला, दोस्त आहे आपला त्याला कधीही वाटलं तर तो शोमध्ये येऊ शकतो. मी त्याला भेटून पण आलो होतो. तो माझ्या भावासारखा आहे. त्याला वाटलं तेव्हा तो शो मध्ये येऊ शकतो.
शाहरूखसोबत एपिसोड करू शकलो नाही...
या फेसबूक लाइव्ह दरम्यान कपिलने शाहरूखसोबत शुटिंग करू शकलो नाही याचे कारणही सांगितले, तो म्हणाला, माझ्या नव्या चित्रपटाचे शुटिंग आणि एपिसोडची शुटिंग या दरम्यान आजारी पडलो.
यावेळी एका फॅनने विचारले की फिरंगीच्या शुटिंगमुळे शाहरुखसोबतचे शुटिंग कॅन्सल झाले. त्यावर कपिल म्हणाला, तो शो पण माझा आहे आणि चित्रपटही माझा आहे. मी कोणालाही मिस केले तर माझे नुकसान होते. शाहरुख भाईसोबत एपिसोड मिस केला तर माझे जास्त नुकसान झाले. शोमधून मला पैसे मिळतात, तर चित्रपटासाठी मी पैसे लावले आहे.