आता WhatsApp आणि लॅन्डलाईनवर वापरू शकता ChatGPT

OpenAI नं गुरुवारी त्याच्या अमेरिकेतील आणि कॅनडाच्या वापरकर्त्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं की चॅटजीपीटीचा वापर करुन ते फ्लिप फोन आणि लॅन्डलाइफ फोनवर देखील बोलू शकतात. तर हे कसं याविषयी देखील त्यांनी सांगितलं आहे. 

| Dec 19, 2024, 15:36 PM IST

OpenAI नं गुरुवारी त्याच्या अमेरिकेतील आणि कॅनडाच्या वापरकर्त्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं की चॅटजीपीटीचा वापर करुन ते फ्लिप फोन आणि लॅन्डलाइफ फोनवर देखील बोलू शकतात. तर हे कसं याविषयी देखील त्यांनी सांगितलं आहे. 

1/7

आता हे कसं करता येईल तर त्यासाठी तुम्हाला 1-800-CHATGPT वर कॉल करावा लागेल आणि हे तुम्ही महिन्यात एकूण 15 मिनिटांसाठी करु शकतात. 

2/7

त्यामुळे आता चॅटजीपीटी वापरणं हे आधीपेक्षाही अधिक सोपं झालं आहे. चॅटजीपीटवर कोणतंही वेगळं सबस्क्रिप्शन सांगितलेलं नाही. 

3/7

यावेळी वापरकर्ते हे त्यांना असलेले खासगी प्रश्न विचारू शकतात आणि चॅटजीपीटी तुम्हाला वेगवेगळ्या भाषेतील नवीन फ्रेज शिकायला मदत करतात. त्यामुळे सहज आपण कोणाशी तरी बोलतोय असं वाटतं. 

4/7

दुसऱ्या देशांमधील लोक हे व्हॉट्सअॅपवरून चॅटजीपीटीनं संपर्कसाधू शकतात. त्यासाठी त्यांना फक्त 1-800-242-8478 या फोन नंबरवर मेसेज करायचा आहे. 

5/7

ज्या प्रकारे ChatGPT साठी एक डेडिकेटेच अॅप आहे. त्याचप्रमाणे व्हॉट्सअॅपवर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांच उत्तर देऊ शकतं. 

6/7

दरम्यान, जर तुम्हाला कोणताही फोटो बनवायचा असेल किंवा व्हॉईस मोड हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला ChatGPT एकतर वेब किंवा ऑफिशियल अॅप वापरावं लागेल. 

7/7

OpenAI नं या गोष्टीवर शिक्कामोर्तब केला आहे की येत्या काळात वापरकर्ते हे पुढे जाऊन त्यांच्या व्हॉट्सअॅप अकाऊंटला चॅटजीपीटीशी ऑथेंटिकेट करु शकता. त्यामुळे त्यांना चॅट करताना आणि इमेज बनवताना अनेक वेगवेगळ्या गोष्टी करता येतील.