Vaayu Krunal Pandya: पंड्या कुटुंबामध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. कारण पांड्या घराण्यात नव्या सदस्याने जन्म घेतलाय. कृणाल पांड्या याला मुलगा झालाय. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्याने याबद्दलची माहिती दिली. यानंतर चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षावर होताना दिसत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृणाल पंड्याने आपल्या मुलाचे नाव वायू असे ठेवले आहे. त्याच्या आधीच्या मुलाचे नाव कवीर असे आहे. कृणालने आपली पत्नी आणि 2 मुलांचा फोटो सोशल मीडियात शेअर केलाय. वायु कृणाल पांड्या असे स्टेटस त्याने दिले आहे. कृणाल पांड्या टीम इंडियाचा खेळाडू आहे. सध्या तो आयपीएलच्या 14 व्या सिझनमध्ये लखनौ सुपर जाएंट्समधून खेळतोय. कृणाल नेहमी आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यातील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. 


Hardik Pandya: आम्ही ज्या काही चुका केल्या...; हार्दिक पंड्याने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?


कृणाल हा आपला भाऊ हार्दिक पंड्याप्रमाणेच ऑल राऊंडर आहे. तो डावखुरा बॅटर असून स्लो लेफ्ट आर्म बॉलरदेखील आहे. 2018 मध्ये इंडियन क्रिकेट टीममध्ये त्याने पदार्पणाचा सामना खेळला. हार्दिक पंड्याचा तो मोठा भाऊ आहे. 



2016-17 मध्ये बडोदामधून रणजी ट्रॉफी खेळत त्याने आपले फर्स्ट क्लास क्रिकेटमधील डेब्यू केले. त्यानंतर  2016-17 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना आघाडीचा रन्स स्कोरर आणि विकेट टेकर ठरला. त्याने 8 मॅचमध्ये 366 रन्स केले होते. म्हणजेच तो 45.75 च्या सरासरीने खेळत होता. त्याचा 81.33 इतका स्ट्राइक रेट होता. यामध्ये 3 अर्धशतकीय खेळीचा समावेश आहे.  तसेच दुसरीकडे 8 मॅचमध्ये त्याने 11 विकेटही घेतल्या होत्या. 


कृणाल नव्या पाहुण्याच्या आगमनाने चर्चेत असला तरी त्याच्या भाऊ हार्दिक हा मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी घेतल्यापासून टीकेचा धनी होतोय. रोहित शर्माला डावलून हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सचा कॅप्टन करणे हे अनेक क्रिकेटप्रेमींना रुचलेले नाही. त्यामुळे मैदान आणि मैदानाबाहेर सोशल मीडियात हार्दिक पंड्या ट्रोल होताना दिसतो. त्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सला खास खेळ करुन दाखवता आला नाही. त्यात हार्दिकलाही आपला फॉर्म गवसला नाहीय. त्यामुळे हार्दिकच्या ट्रोलिंगमध्ये आणखीनच भर पडलीय.