आपल्या भारतात सुरु झालेय पाण्यावर धावणारी जगातील पहिली मेट्रो ट्रेन; 38 स्टेशनचा अतिशय सुंदर प्रवास

ही मेट्रो इतर मेट्रोपेक्षा फार वेगळी आहे. ही मेट्रो ट्रॅकवर नाही तर पाण्यावर धावते. 

Jan 03, 2025, 20:24 PM IST

Water Metro In India :  जगातील इतर देशांप्रमाणेच भारतातही मेट्रो ट्रेनचे जाळे विस्तारले जात आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये मेट्रो ट्रेन सुरु झाली. अशातच  भारतात  पाण्यावर धावणारी जगातील पहिली मेट्रो ट्रेन सुरु झाली आहे. रेल्वे वाहतुकीचे सर्वात अत्याधुनिक माध्यम आहे. यामुळे प्रवास अधित जलद आणि सुकर झाला आहे. जाणून घेऊया भारतातील कोणत्या राज्यात सुरु झालेय ही मेट्रो.

1/7

 पाण्यावर धावणारी जगातील पहिली मेट्रो ट्रेन आपल्या भारतात सुरु झाली आहे. भारतातील या पहिल्या वॉटर मेट्रोचा 38 स्टेशनचा प्रवास अतिशय सुंदर आहे. 

2/7

केरळ मध्ये मोठ्या संख्यने पर्यटक येत असतात. यामुळे ही वॉटर मेट्रो पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे. पर्यटकांना जलमार्गे केरळचे सौंदर्य अनुभवता येणार आहे.  

3/7

26 एप्रिल 2023 रोजी ही मट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.   

4/7

या वॉटर मेट्रोमध्ये 50 ते 100 प्रवासी बसू शकतात. याचे कमाल भाडे 40 रुपये आहे.   

5/7

दोन नद्यांना जोडणारी अशी ही वॉटर मेट्रो रेल्वे सेवा आहे. 

6/7

कोची वॉटर मेट्रो मार्गात एकूण 38 स्थानके आहेत. 

7/7

केरळमधील कोची येथे भारतातील पहिली वॉटर मेट्रो सुरु झाली आहे.