भारताच्या या बॉलरला मंगळावर गेल्यावर हे काम करायचय
भारतीय क्रिकेट टीम सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खास करुन बॉलर्सनी प्रभावी कामगिरी केली आहे. यामध्ये हार्दिक पंड्या आणि कुलदिप यादव यांना चांगला फॉर्म गवसल्याचे चित्र आहे.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट टीम सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खास करुन बॉलर्सनी प्रभावी कामगिरी केली आहे. यामध्ये हार्दिक पंड्या आणि कुलदिप यादव यांना चांगला फॉर्म गवसल्याचे चित्र आहे.
कुलदिपने या मॅचमध्ये ४० रन्स देऊन ४ महत्त्वाचे विकेट घेतले. कुलदीप यादवने एका मुलाखतीत अनेक प्रश्नांना आपल्या खास अंदाजात उत्तरे दिली. यामध्ये स्वत:च्या कुलनेसला त्याने ८ गुण दिले आहेत. मंगळावर जाण्यासंबधी त्याला काही प्रश्न विचारण्यात आले. जर तुला केवळ १५ मिनिटे मंगळावर जाण्यास मिळाली तर काय करशील ? असा प्रश्न विचारण्यात आला.
१५ मिनिटे तर सेटल होण्यासाठीच लागतील. पण काही ना काही तरी करेनच. बॉलिंगच करेन. बघेन बॉल किती टर्न होतो. असे त्याच मजेशिर पद्धतीने त्याने याचे उत्तर दिले.