वयाच्या २५ वर्षी माधुरी `या` क्रिकेटवर फिदा होती
हा क्रिकेटर कोणी साधासुधा क्रिकेटर नव्हता. तो त्याच्या काळातील दिग्गज क्रिकेटर होता.
मुंबई : क्रिकेट आणि बॉलिवूडचं नातं गेल्या काही दशकापासूनचं आहे. तेजाब मधल्या ''एक दो तीन'' या गाण्यामुळे घराघरात पोहचलेल्या माधुरी दीक्षितवर केवळ भारतच नाही, तर परदेशातील चाहते देखील फिदा होते. परंतू असे असताना माधुरी एका क्रिकेटवर फिदा होती. यशाच्या शिखरावर असताना माधुरी एका क्रिकेटबद्दल असे काही म्हणाली होती की, ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत राहिली होती.
माधुरीचे अनेकदा अभिनेता अनिल कपूर आणि संजय दत्त यांच्यासोबत नाव जोडले होते. अशी चर्चाजदेखील होती. पण ती या अभिनेत्यांच्या प्रेमात नसून ती आजपासून २३ वर्षांपूर्वी एका क्रिकेटरच्या प्रेमात पडली होती.
हा क्रिकेटर कोणी साधासुधा क्रिकेटर नव्हता. तो त्याच्या काळातील दिग्गज क्रिकेटर होता. त्याने आपल्या खेळीने क्रिकेट चाहत्यांसोबत माधुरीच्या मनात स्थान मिळवले होते. माधुरीने या क्रिकेटरसाठी 'सेक्सी' शब्दप्रयोग वापरला होता. त्याकाळी हा शब्द फारच कमी वापरला जायचा. हा भाग्यवान क्रिकेटर दुसरा तिसरा कोणी नसून आपले 'लिटील मास्टर' अशी ओळख असलेले सुनील गावस्कर होते. जीच्या पाठी सारी दुनिया दिवानी, ती आपली दिवानी, बातच न्यारी. तेव्हा आपले गावसकर पण काही कमी देखणे नव्हते. त्यांनी देखील आपल्या खेळाने अनेकांच्या मनावर मोहिनी घातली होती.
माधुरी म्हणाली की, 'मी सुनील गावसकरांची वेडी आहे. ते खरंच फार सेक्सी आहेत'. या आशयाचं वक्तव्य 'इंडिया टुडेने' प्रकाशित केले होते. ही गोष्ट ऑक्टोबर १९९२ ची आहे. तेव्हा गावसकर हे ४३ वर्षाचे होते आणि माधुरी अवघ्या २५ वर्षांची. म्हणजेच दोघांमध्ये १८ वर्षाचं फरक. पण ते म्हणतात ना, प्रेमात कसलेही निकष नसतात, तेच खरं.