Dhoni with MC Stan Netizens react : 'बिग बॉस सीजन 16' चा विजेता एमसी स्टॅनला सगळेच ओळखतात. तो काय काम करतोय कुठे असतो हे सगळ्यांनाच ठावूक आहे. त्याच्या रॅपचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर सुद्धा त्याचे लाखो चाहते आहेत. अनेकदा त्याच्या कॉन्सर्टमुळे तो चर्चेत राहतो. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचं चर्चेत येण्याचं कारण त्याचा कॉन्सर्ट नाही, तर भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आहे. त्या दोघांचे काही फोटो समोर आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमसी स्टॅन आणि महेंद्र सिंह धोनी यांचे फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केले आहेत.  सोशल मीडियावर हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. तर हे फोटो स्वत: एमसी स्टॅननं देखील शेअर केले आहेत. या फोटोत त्या दोघांनी सूट परिधान केल्याचे दिसत आहे. हे फोटो शेअर करत एमसी स्टॅननं कॅप्शन दिलं की 'एमएस धोनीसोबत काही खास शूट केलं आहे.' आता त्या दोघांना एकत्र पाहिल्यानंतर सगळ्यांना एकच प्रश्न पडला आहे की नेमकं असं काय झालं. 



या व्हायरल होत असलेल्या फोटोत महेंद्र सिंग धोनी हा एमसी स्टॅनचं फेमस असलेलं P Town साइन करताना दिसत आहे. दोघांना पाहून हे तर लक्षात आलं की त्यांच्या चाहत्यांसाठी हे खूप मोठं सरप्राइज असणार आहे. यात ते काही तरी हटके करतील. अनेकांना वाटतं की ही एक अॅड शूट असू शकते किंवा कोणत्या कार्यक्रमात गेस्ट अपीयरंस असू शकते. काही बोलू शकत नाही. 


हेही वाचा : अखेर कंगनाला मिळालं राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण! व्हिडीओ शेअर करत दाखवली निमंत्रण पत्रिकेची झलक


या व्हायरल होत असलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'धोनीच्या करिअरचा अंत होतोय.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'धोनी सर काय मजबूरी होती तुमची.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'माही का? असं का?' तिसरा नेटकरी म्हणाला, 'माही भाई तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती.' आणखी एक नेटकरी म्हणाला की 'धोनी भाई काय मजबूरी होती. आता असे दिवस पाहायला मिळतील.' दुसरा नेटकरी म्हणाला, लेजंडसोबत छपरी.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'देवा, देवा काय मजबूरी होती. माझी इच्छाच मेली.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'ते दोघं एका फ्रेममध्ये दिसतील ही अपेक्षा केलीच नव्हती.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मला लाज वाटते.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'पहिल्यांदा माहीवर राग येतोय. या छपरी लोकांसोबत नका राहत जाऊ माही.' आणखी एक म्हणाला, 'माही या मागचं कारण काय.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'मला वाटतं माही भाईची लोकप्रियता आता वाढणार.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'या कोलॅबरेशनविषयी मी कधी विचार केला नव्हता.'