अखेर कंगनाला मिळालं राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण! व्हिडीओ शेअर करत दाखवली निमंत्रण पत्रिकेची झलक

Kangana Ranaut Ram Mandir Inauguration : कंगना रणौतनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

दिक्षा पाटील | Updated: Jan 6, 2024, 01:07 PM IST
अखेर कंगनाला मिळालं राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण! व्हिडीओ शेअर करत दाखवली निमंत्रण पत्रिकेची झलक title=
(Photo Credit : Social Media)

Kangana Ranaut Ram Mandir Inauguration : अयोध्येत राम मंदिराचा प्राण-प्रतिष्ठेची तयारी जोरात सुरु आहे. 22 जानेवारी रोजी प्राण-प्रतिष्ठा होणार आहे. याच शुभ आणि खास दिवशी अनेक कलाकार, बिझनेसमेन आणि राजकारणी लोकांना निमंत्रण करण्यात आले आहे. यात कलाकारांच्या यादीत दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत, प्रभास ते बॉलिवूडमधून आलिया भट्ट, रणबीर कपूर पासून अनेक कलाकारांना निमंत्रण मिळालं आहे. दरम्यान, या सगळ्यात कंगना रणौतला निमंत्रण मिळालं की नाही याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नव्हती. मात्र, आता कंगनाला देखील निमंत्रण मिळाल्याचे समोर आले आहे. त्याचा खुलासा कंगना रणौतनं स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला आहे. 

कंगनानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. कंगनानं अखेर तिला राम मंदिराच्या प्राण-प्रतिष्ठेसाठी निमंत्रण दिलयं. त्याची झलक कंगनानं 'राम सिया राम' गाणं लावलं आहे. निमंत्रण पत्राची तिनं झलक देखील शेअर केली आहे. या निमंत्रण पत्राच्या पहिल्या पानावर श्री राम यांचे चित्र आहे. चला तर पाहुया याची झलक. 

दरम्यान, कंगनाला हे निमंत्रण मिळाल्यानंतर गुगलवर सतत अनेक गोष्ट सर्च करण्यात येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे या आधी कोणत्या कोणत्या कलाकारांना किंवा व्यक्तींना निमंत्रण मिळालं आहे. काही रिपोर्ट्सनुसार, राम मंदिर ट्रस्टनं 7000 लोकांना निमंत्रण पाठवलं आहे. ज्यात 3000 व्हीआयपी सहभागी झाले होते. राम मंदिरच्या प्राण-प्रतिष्ठेसाठी निमंत्रीत करण्यात आलेल्या भारतीय कलाकारांची देखील खूप मोठी अशी यादी तुम्हाला पाहायला मिळेल. या यादीत अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अनुपम खेर, माधुरी दीक्षित, सनी देओल, टाइगर श्रॉफ, आयुष्मान खुराना, अजय देवगन, कंगना रणौत हे कलाकार आहेत. याशिवाय दिग्दर्शक मधुर भंडारकर आणि संजय लीला भन्साळीला देखील निमंत्रण देण्यात आलं. दाक्षिणात्या कलाकारांविषयी बोलायचे झाले तर सुपरस्टार रजनीकांत यांना या ऐतिहासिक दिनाच्या निमित्तानं निमंत्रण मिळाले आहे. याशिवाय प्रभास, चिरंजीवी, मोहनलाल, धनुष, यश आणि ऋषभ शेट्टी यांना देखील निमंत्रण मिळालं आहे. 

हेही वाचा : 'ही बाई कोण आहे?', शाहरुखच्या 'या' अभिनेत्रीवर भडकला Orry; जाणून घ्या नेमकं काय घडलं

दीपिका चिखलिया ज्यांनी दुरदर्शनवरील रामायणात सीतेची भूमिका साकारली होती. त्यांना देखील यासाठी निमंत्रण मिळाले आहे. याशिवाय सचिन तेंदुलकर आणि विराट कोहली यांच्यासोबत आणखी काही भारतीय क्रिकेटपटूंना निमंत्रण देण्यात आलं आहे. याशिवाय असे देखील म्हटले जाते की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावेळी भाषण देणार आहेत.