Ms Dhoni South Actress Relationship : महेंद्रसिंग धोनी ज्याला MS धोनी म्हणून ओळखतात. भारतीय क्रिकेटचा इतिहासातला लेजंड म्हणून ओळखला जातो. 2007 मधील आयसीसी टी-20 विश्वचषक, 2011 मधील आयसीसी क्रिकेट विश्वचषक आणि 2013 मधील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी या तीनही प्रमुख आयसीसी ट्रॉफी जिंकणारा धोनी हा जगातील एकमेव कर्णधार आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, असं फार कमी झालं की धोनी त्यांचा वैयक्तिक आयुष्यामुळे फार चर्चेत आला. असे असले तरी फार कमी लोकांना माहित असेल की धोनीचे एका अभिनेत्रींसोबत नाव जोडले गेले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नाआधी धोनीचे नाव एका दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीसोबतचे जोडले जात होते. धोनीने त्याच्या नात्याबद्दल कधीच उघडपणे सांगितले नाही, पण तो आणि दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री 2008 ते 2009 दरम्यान अनेकदा एकत्र दिसले. ही अभिनेत्री राय लक्ष्मी आहे. या काळात, इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या सामन्यांनंतरच्या पार्ट्यांमध्ये ते अनेकदा एकत्र दिसले, ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. 



इतकंच नव्हे तर माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी अगदी राय लक्ष्मीच्या वाढदिवसाच्या पार्टीत त्याचा मित्र आणि टीम इंडियाचा क्रिकेटर सुरेश रैनासोबत दिसला होता. मात्र कालांतराने, धोनी आणि राय लक्ष्मी विभक्त झाले. धोनीने 2010 मध्ये साक्षीशी लग्न केले. राय लक्ष्मीनं 2014 च्या एका मुलाखतीत धोनीसोबतचे तिचं नातं आणि ब्रेकअप याबद्दल खुलेपणाने चर्चा केली. राय लक्ष्मी म्हणाली, 'मला आता असे वाटायला लागले आहे की माझं आणि धोनीच नातं  हे एखादा डाग किंवा शरिरावर असलेल्या खुने प्रमाणे आहे, जे अनेक काळ माझ्यासोबत राहणार आहे. मला आश्चर्य वाटते की लोकांमध्ये अजूनही या विषयावर  बोलण्याची किंवा चर्चा करण्याची ऊर्जा आणि संयम आहे.'


हेही वाचा : विजय सेतुपतिची इंटरनेटवाली लव्ह स्टोरी! पत्नी पासून मुलांविषयी 'या' गोष्टी तुम्हाला माहितीये का?


साक्षीसोबत लग्नापूर्वी महेंद्रसिंग धोनी राय लक्ष्मीसोबत रिलेशशीपमध्ये होता असं म्हटलं जात. धोनी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल क्वचितच बोलत असला तरी, त्या काळात त्यांच्या अफेअरची मीडियामध्ये खूपच चर्चा रंगली होती. मात्र, धोनीनं साक्षीसोबत लग्न करून या चर्चांवर पूर्णविराम लावला आणि आता तो आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे.