रांची : भारतीय संघाच्या 'कॅप्टन कूल' महेंद्र सिंह धोनीची (MS Dhoni) पत्नी साक्षी धोनीने (Sakshi Dhoni) झारखंडची राजधानी रांचीमध्ये विजपुरवठा खंडित झाल्याने सोशल मीडियावर याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. गुरुवारी ट्विट करत तिने, रांचीतील सर्व नागरिक दररोजच्या वीज कपातीमुळे त्रस्त असल्याचे सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दररोज ४ ते ७ सात वीज कपात होत असल्याचे ती म्हणाली. गुरुवारी संध्याकाळी साक्षीने ट्विट करत, गेल्या ५ तासांपासून वीज नाही. आज हवामानही चांगले आहे, आज कोणता सणही नाही. संबंधितांकडून लवकरात लवकर ही समस्या सोडवली जाईल अशी आशा तिने व्यक्त केली आहे.



साक्षीचे ट्विट व्हायरल झाल्यानंतर, उर्जा वितरण निगम लिमिटेडने यावर उत्तर दिले. ठाकूर गावाजवळ नवीन सब स्टेशन तयार होत आहे. त्यामुळे ३३ केव्ही पॉवर ट्रान्सफॉर्मर लावण्यात आल्याने विजपुरवठा रोखण्यात आला. त्यामुळे काही भागातील विजपुरवठा ७ तासांपासून खंडित करण्यात आला. याबाबत माहितीही जाहीर करण्यात आली असल्याचे उर्जा वितरण निगम लिमिटेडकडून सांगण्यात आले.


धोनी वर्ल्ड कपनंतर काश्मीरमध्ये आर्मी ड्यूटीवर होता. त्यानंतर गुरुवारी उशिरा धोनी पहिल्यांदाच रांचीमध्ये पोहचला. यावेळी त्याच्यासोबत विमानतळावर साक्षीलाही पाहण्यात आले.