नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचे दूसरे रिसेप्शन मंगळवारी मुंबईत पार पडले. या रिसेप्शनला क्रिडा आणि कला विश्वातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. मात्र सर्वात लक्षवेधी ठरला तो म्हणजे विरूष्काचा धमाकेदार डान्स. त्याचबरोबर विरूष्का शाहरूखसोबत छैय्या छैय्या गाण्यावर थिरकले. तर पांड्या ब्रदर्सनेही आपल्या डान्सचा जलवा दाखवून दिला. पाहुया त्याची एक झलक...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



त्याचबरोबर विरूष्काने देखील नाचून आपला आनंद साजरा केला.


 



क्रिडाविश्व लोटले...


सचिनबरोबरच एमएस धोनी, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, हरभजन सिंग, युवराज सिंग, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, उमेश यादव, आर. अश्विन आणि ईशांत शर्मा या क्रिकेटर्सनी रिसेप्शनला हजेरी लावली. तसंच टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आशीष नेहरा, वीरेंद्र सहवाग, झहीर खान, अनिल कुंबळे, सुनील गावसकर आणि संदीप पाटिल हे देखील उपस्थित होते. 
२१ डिसेंबरला दिल्लीत झालेल्या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थिती लावली होती. तेव्हाही विरूष्काने धमाकेदार डान्स केला होता.