नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा फास्ट बोलर भुवनेश्वर कुमार २३ नोव्हेंबर रोजी गुरूवारी विवाहबंधनात अडकला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपली बाल मैत्रिण नुपूर नागसोबत तो या छान नात्यात अडकला आहे. दिल्लीत असलेल्या हॉटेल ब्रावुरामध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी अनेक क्रिकेटर आणि क्रिकेट जगताशी संबंधीत व्यक्ती उपस्थित होत्या. 
काहीच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भुवनेश्वरने नुपूरसोबतचा फोटो शेअर केला होता. त्याचवेळी त्याने आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. भुवनेश्वरने ग्रेटर नॉएडाच्या हॉटेलमध्ये नुपूरसोबत साखरपुडा केला होता. भुवनेश्वर आणि नुपूर मेरठच्या गंगानगरमधील एखाच ब्लॉकमध्ये राहतात. 


कायम क्रिकेटच्या मैदानावर आक्रमक अंदाजात असलेला भुवनेश्वर कुमार लग्नात मात्र अगदी रोमँटिक मूडमध्ये दिसला. लग्नाच्या अनेक विधीमध्ये तो अगदी लाजताना तर कधी मनमुराद हसताना दिसला. गुरूवारी सकाळी गंगानगरमधील घरातून भुवनेश्वर घोडीवर चढून आला होता. यावेळी त्याच्या कुटुंबातील व्यक्ती आणि नातेवाईक, जवळचा मित्र परिवार उपस्थित होता. त्यानंतर ११ वाजता दिल्लीतील हॉटेलमध्ये भुवनेश्वरचा विवाहसोहळा पार पडला. 


हा रोमँटिक क्षण जरूर पाहा 


भुवनेश्वरने कोलकाताहून आलेली गोल्डन रंगाची शेरवानी आणि लाल रंगाचा सेहरा बांधला होता. नुपूरने मोती आणि लाल रंगाने सजलेला लेहंगा घातला असून ती यामध्ये अतिशय सुंदर दिसत होती. 




यावेळी भुवनेश्वरचा सोहळा अतिशय रोमँटिक होता. यावेळी वरमाला घालण्यासाठी स्टेजवर येत असलेल्या वधुला मदत करण्यासाठी अगदी रोमँटिक अंदाजात हात पुढे केला. आणि हा क्षण त्या दोघांबरोबरच उपस्थितांनी देखील अनुभवला. त्यानंतर सात फेरे घेण्याची विधी पार पडली. साडे चार पर्यंत हा सोहळा पार पडला आणि त्यानंतर भुवनेश्वर नुपूरसोबत पुन्हा गंगानगरच्या घरी पोहोचला.  



भुवनेश्वरची आई इंद्रेस यांनी दोघांची आरती करून त्यांचा गृहप्रवेश घेतला. हॉटेल ब्रावुरामध्ये या लग्नसोहळ्यात सुरेश रैना, प्रवीण कुमार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.