World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाकडून श्रीलंकेला ३३५ धावांचे आव्हान
वर्ल्ड कपचा २०वा सामना
लंडन : ओवल मैदानात आज वर्ल्ड कपचा २०वा सामना ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकामध्ये खेळला जात आहे. श्रीलंकाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेसमोर ३३५ धावांचे आव्हान ठेवले आहे.
कर्णधार एरॉन फिंच (१५३) आणि स्टीव स्मिथ (७३) या जोडीने चांगली फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया संघाला फायदा करुन दिला. ऑस्ट्रेलियाने सात विकेटमध्ये ३३४ धावा केल्या. मॅक्सवेल (४६) आणि डेविड वॉर्नर (२६) धावा केल्या. श्रीलंका संघातील धनंजय डीसिल्वा व इसुरू उदानाने २-२ तर मलिंगाने एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार अरॉन फिंचच्या धमाकेदार खेळीवर ऑस्ट्रेलिया ३००चा आकडा पार करु शकली.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून फिंच विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. फिंचने स्टीव स्मिथचाही रेकॉर्ड तोडला आहे. स्टीव स्मिथने नाबाद १२० धावा केल्या होत्या.