google new features :  T20 विश्वचषकाच्या ( T20 World Cup 2022) सामन्यात भारत आणि नेदरलँड्स (India vs Netherlands) यांच्यात दुसरा सामना होत आहे.  सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) हा सामना खेळला जातोय. दरम्यान तुम्हाला जर असेच लाइव्ह मॅचचे स्कोर बघायचे असतील तर काही स्टेप्स फॉलो करा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगलचे असे अनेक फिचर्स आहेत ज्याबद्दल अनेकांना माहिती नाही. असेच एक फीचर आहे जे Android युजर्ससाठी जास्त सुलभ ठरणार आहे. पिन लाइव्ह स्कोअर (Pin Live Score)  हे असेच एक फीचर आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या होम स्क्रीनवर क्रिकेट मॅचचा लाईव्ह स्कोर (cricket live score) पाहता येणार आहे. 


वाचा : दंगलीत भारत सोडला, आज तोच शीख खेळाडू स्वत:च्या देशाविरोधात उतरलाय मैदानात 


पिन लाइव्ह स्कोअरची सेटिंग 


आज भारत आणि नेदरलँड यांच्यात T20 सामना सुरु आहे. तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा इतर कुठेही, काही कामानिमित्त तुम्हाला लाईव्ह मॅच पाहता येत नसेल तर Pin Live Score तुम्हाला फायदेशीर ठरेल. 


- या फीचरसाठी गुगल सर्च पेजवर जावे लागेल. त्यानंतर सुरू असलेल्या मॅच चा लाइव्ह स्कोअर पाहायचा असेल सुरू असलेली मॅच सर्च करावी लागेल. उदा. भारत आणि नेदरलँडसाठी, तुम्हाला India Vs Netherlands शोधावे लागेल.


- यानंतर तुमच्या गुगल सर्च (google search) स्क्रीनवर लाइव्ह स्कोर कार्डसह एक पेज ओपन होईल. येथे तुम्हाला लाइव्ह वॉच, लाइव्ह स्कोअर पिन आणि इतर अनेक पर्याय मिळतील.


- तुमच्या होम स्क्रीनवर थेट स्कोअर पिन करण्यासाठी, तुम्हाला पिन लाइव्ह स्कोअर पर्याय निवडावा लागेल. असे केल्याने तुमच्या स्क्रीनवर थेट स्कोअर पिन होईल. या फीचरमुळे तुम्हाला स्क्रीन पुन्हा रीफ्रेश करण्याची आवश्यकता नाही. मुख्यपृष्ठ स्क्रीनवर तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही थेट स्कोअर पाहू शकता.