T20 World Cup : टी-20 वर्ल्डकपवर दहशतवादाचं सावट! पाकिस्तानातून देण्यात आली धमकी
T20 World Cup : वेस्ट इंडिज येथे जवळपास महिन्याभरात आयोजित केल्या जाणाऱ्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेआधी दहशतवादी संघटनांनी दिलेल्या धमकीमुळं यंत्रणांना हादरा बसला आहे.
T20 World Cup : आयपीएल (IPL 2024) चा अखेरचा सामना खेळवण्यात आल्यानंतर लगेचच अवघ्या काही दिवसांत टी20 क्रिकेट वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. सध्या यजमानानांच्या वतीनं या स्पर्धेच्या आयोजनाची सर्व व्यवस्था आणि तयारी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच या स्पर्धेसाठी काहीशी चिंताजनक बातमी समोर आली आहे. कारण, टी20 वर्ल्डकपवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी पडली असून, दहशतवादी संघटनेकडून तशी धमकी आल्यामुळं सुरक्षा यंत्रणांना हादरा बसला आहे.
क्रिकबजनं प्रसिद्ध केलेल्या प्राथमिक वृत्तानुसार स्पर्धेचे सयआयोजक असणाऱ्या वेस्ट इंडिजला उत्तर पाकिस्तानातून ही धमकी आल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यानंतर वेस्ट इंडिजमधील CWI च्या वतीनं आपल्याकडून सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आल्याची हमी देण्यात आली आहे.
हेसुद्धा वाचा : 'मागील काही वर्षांमध्ये...'; स्ट्राइक रेटमुळे T20 वर्ल्डकपमधून वगळल्यानंतर केएल राहुल स्पष्टच बोलला
'प्रो-इस्लामिक स्टेट (IS) नं टी20 वर्ल्डकप आणि तत्सम क्रीडाविषय आजोयनांविरोधात मोहिमा सुरु केल्या असून, त्याअंतर्गतच ही धमकी देण्यात आल्याचं कळत आहे. यामध्ये अफगाणिस्तान- पाकिस्तान शाखा, आयएसखोरासन (IS-K) च्या व्हिडीओ मेसेजचाही समावेश असून, त्या माध्यमातून अनेक देशांमधील हिंसाचारावर प्रकाश टाकण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर या संघटनांकडून तत्सम कारवायांचं समर्थन करणाऱ्यांना युद्धात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.