मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्‍का शर्मा यांचा इटलीमध्ये विवाह पार पडल्यानंतर मंगळवारी मुंबईमध्ये त्यांनी खास ग्रँड रिसेप्शन ठेवलं होतं.


शाहरुखसोबत विरुष्काचा डान्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या रिसेप्शनला बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने देखील हजेरी लावली होती. यावेळी शाहरुखसोबत विराट आणि अनुष्काने डान्स देखील केला. ग्रँड रिसेप्शनमध्ये विराट आणि अनुष्कासोबतच शाहरुखच्या डान्स चर्चेचा विषय ठरला



दिग्गजांची हजेरी


बॉलिवूड आणि क्रिकेटमधल्या व्यक्तींसाठी हे खास रिसेप्शन ठेवण्यात आलं होतं. अनेक दिग्गज या रिसेप्शनला उपस्थित होते. विरूष्काच्या मुंबईतील रिसेप्शन सोहळ्याला सुमारे ६०० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मुंबईतील रिसेप्शनला अभिनेता बोमन इराणी, संदीप पाटील सपत्निक पोहचले होते. सोबतच क्रिकेटर रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मनीष पांडे हे देखील पोहोचले होते.


अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, कॅटरिना कैफ, रनबीर कपूर, सौरव गांगुली लारा दत्ता, माधुरी दीक्षित, ए.आर रेहमान यांनी देखील या रिसेप्शनला हजेरी लावली.