विराट-अनुष्काने लग्नात पाहुण्यांना दिलं हे रिटर्न गिफ्ट
विराट कोहलीचे लग्न होऊन आता बरेच दिवस झाले असले तरी चाहत्यांमध्ये अजूनही त्याच्या चर्चा आहेत. या गुप्त विवाहाबद्दलची प्रत्येक अद्ययावत माहिती जाणून घेण्याची इच्छा चाहत्यांमध्ये आहे.
मुंबई : विराट कोहलीचे लग्न होऊन आता बरेच दिवस झाले असले तरी चाहत्यांमध्ये अजूनही त्याच्या चर्चा आहेत. या गुप्त विवाहाबद्दलची प्रत्येक अद्ययावत माहिती जाणून घेण्याची इच्छा चाहत्यांमध्ये आहे.
कोणी केलं विवाहाचं प्लॅनिंग
विराटच्या विवाहाचं नियोजन करणारी देविका नारायण यांनी एका मुलाखतीत विराट अनुष्काच्या गुप्त वेडिंगबद्दल अनेक खुलासे केले आहेत. विराट आणि अनुष्काच्या विवाहात खूप कमी लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. देविका यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यासाठी सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे विवाहाची तयारी गुप्त ठेवणे.
काय होतं रिटर्न गिफ्ट
वेडिंग प्लानर देविका यांनी लग्नात आलेल्या पाहुण्यांना काय रिटर्न गिफ्ट दिलं याबाबतही खुलासा केला आहे. देविकाने सांगितलं की खूप कमी लोकांना माहित आहे की विराट आणि अनुष्का खूप अध्यात्मिक व्यक्ती आहेत. अध्यात्मावर त्यांचा खूप विश्वास आहे. हे रूमीच्या शायरीचे फॅन आहेत म्हणून त्यांनी पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून रूमीच्या कवितांचं संकलन भेट म्हणून दिली. फिनलँडमध्ये सध्या ते हनीमून एन्जॉय करत आहेत.