नवी दिल्ली : विराट-अनुष्काचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला. सोशल मीडियावर फोटोज शेअर करत त्यांनी आपल्या लग्नाची बातमी सर्वांना दिली. 


फोटोज सोशल मीडियावर व्हायरल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट-अनुष्काच्या लग्नाच्या विविध विधींचे फोटोज सोशल मीडियावर पाहायला मिळाले. त्यांच्या चाहत्यांनी त्यावर लाईक्स, कमेंटसची बरसात केली. 
आता त्यांचा एक रोमांटिक फोटो समोर येत आहे. तर एका फोटोत ते आपल्या कुटुंबियांसोबत एन्जॉय करताना दिसत आहेत. 


रोमांटिक अंदाज 


हे फोटोज अनुष्काच्या एका फेंड्ने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इटलीत फिरताना तिथल्या वातावरणात विराट-अनुष्का काहीसे रोमांटिक झाले. त्यांचा हा खास अंदाज फोटोतून झळकत आहे.




लग्नाचे रिसेप्शन 


गेल्या गुरूवारी अनुष्का आपल्या कुटुंबियांसोबत इटलीली रवाना झाली. त्यांच्यासोबत त्यांच्या परिवाराचे पंडीत देखील होते. 11 डिसेंबर इटलीतील टस्‍कनी शहरात हे दोघे विवाहबद्ध झाले. पंजाबी पद्धतीने हा सोहळा करण्यात आला. लग्नाचे रिसेप्शन 21 डिसेंबरला दिल्लीत तर 26 डिसेंबरला मुंबईत आयोजित करण्यात आले आहे.