'आशिकी 3' मध्ये तृप्ती डिमरीचा पत्ता कट! आता दिसणार 'ही' मराठमोळी अभिनेत्री?

बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी ही सतत सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता तृप्तीचं चर्चेत येण्याचं कारण तिचा एक चित्रपट आहे. खरंतर तृप्ती ही बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनसोबत 'आशिकी 3' या चित्रपटात दिसणार होती.  दरम्यान, आता ती या चित्रपटात दिसणार नसून तिची जागा एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं घेतली आहे. ती कोण याविषयी जाणून घेऊया....

| Jan 09, 2025, 16:08 PM IST
1/7

तृप्ती डिमरी आता या चित्रपटाचा भाग नसल्यानं आता निर्माते अभिनेत्रीच्या शोधात आहेत. तर त्यांनी यावेळी कोणत्या अभिनेत्रीची चर्चा सुरु असेल तर ती आहे शर्वरी वाघची.

2/7

'मिड-डे'नं दिलेल्या माहितीनुसार, तृप्ती आता 'आशिकी 3' मध्ये काम करणार नाही. रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की शूटिंगला उशिर होणार असल्यानं तृप्तीनं तिच्या मनानं चित्रपटातून काढता पाय घेतला आहे. 

3/7

अशात निर्माते हे महत्त्वाच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीच्या शोधात आहेत. सध्या निर्मात्यांमध्ये शर्वरी वाघच्या नावाची चर्चा असल्याचे म्हटले जात आहे. 

4/7

खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक हे 'आशिकी 3' ला घेऊन उत्सुक आहेत. सगळ्यात आधी म्हटले जात होते की टी-सीरिज या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. तर टी-सीरिजनं एक स्टेटमेन्ट देत सांगितलं की ते हा चित्रपट बनवणार नाही आहेत. 

5/7

त्याशिवाय त्यांनी सांगितलं की अनुराग बसूच्या चित्रपटाचा याच्याशी काही संबंध नाही.  आशिकी हा चित्रपट 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. 

6/7

त्यानंतर 2013 मध्ये या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. 

7/7

या सगळ्यात 'आशिकी 3'मध्ये कार्तिक आर्यनसोबत कोणती अभिनेत्री दिसणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.