नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचे रिसेप्शन दिल्लीत आयोजित करण्यात आले होते. यासाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रित करण्यात आले होते. तसंच ५०० हून अधिक लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. 


रिसेप्शनला विरूष्काचा जबरदस्त डान्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या रिसेप्शनला खरी रंगत आणली ती विरूष्काच्या डान्सने. तिने जबरदस्त डान्स केला. अगदी नोट तोंडात पकडून.. एकदम दिल्ली स्टाईलमध्ये... या तिच्या आनंदात विराटही सहभागी झाला आणि त्याने तिला डान्समध्ये साथ दिली. पहा त्याचे काही खास व्हिडिओज....




मुंबईतही रिसेप्शन


२६ डिसेंबर रोजी मुंबईतही एका पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये अनेक दिग्गज बॉलिवूड स्टार्स उपस्थित होतील.



कामाला सुरूवात


मुंबईमधलं रिसेप्शन झाल्यावर विराट कोहली भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला रवाना होईल. तर जानेवारी महिन्यामध्ये अनुष्का शर्मा नवीन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल.