नवी दिल्ली : काही दिवसांपुर्वी भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार आणि बॉलीवू़ड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचे लग्न होणारे असल्याचे वृत्त आले होते.


ही तर अफवा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र अनुष्काने दिलेल्या पुष्टीवरून ही अफवा असल्याचे समोरे आले. पण काही घटना अशा घडत आहेत की, पुन्हा एकदा यांच्या लग्नाच्या चर्चेला उधाण आले आहे. कारण काल रात्री अनुष्का तिच्या परिवारसह इटलीला रवाना झाली. इतकंच नाही तर त्यांच्या कुटुंबाचे पंडीत देखील त्यांच्यासोबत इटलीला गेले.


विरूष्काच्या लग्न पक्के ?


यामुळे अनुष्काने कितीही सांगायचे टाळले तरी विरूष्काच्या लग्नाचे पक्के झाल्याचे दिसून येत आहे. गुरूवारी मुंबईच्या छत्रपति शिवाजी एयरपोर्टवर अनुष्का परिवारासह दिसून आली. सुरूवातीला अनुष्का पुढे निघाली, त्यानंतर तिचे कुटुंबीय विमानतळावर दाखल झाले. यादरम्यान अनुष्काने मीडियाशी संवाद साधणे टाळले. फक्त धन्यवाद देऊन ती पुढे निघाली.



पंडीतही इटलीला ?


अनुष्का जेव्हा इटलीसाठी रवाना होत होती तेव्हा तिच्यासोबत एक दाढीवाली व्यक्ती देखील होती. ती व्यक्ती गेल्या वर्षी विराट-अनुष्कासोबत डेहराडूनमध्ये देखील दिसली होती. याच पंडीतांसोबत विराट-अनुष्का पुजा करताना दिसले होते. 
आता ते पंडीत का बरे अनुष्कासोबत इटलीला गेले असतील ? हा प्रश्नच आहे.