विरुष्काने आमंत्रण पत्रिकेसोबत दिला `हा` खास संदेश!
इटलीतील टस्कनीमध्ये विरूष्काच्या शाही विवाहसोहळा पार पडल्यानंतर आता त्यांच्या रिसेप्शनची तयारी सुरू झाली आहे.
मुंबई : इटलीतील टस्कनीमध्ये विरूष्काच्या शाही विवाहसोहळा पार पडल्यानंतर आता त्यांच्या रिसेप्शनची तयारी सुरू झाली आहे. हे ग्रॅंड रिसेप्शन २१ डिसेंबरला दिल्लीत तर २६ डिसेंबरला मुंबईत होणार आहे.
पत्रिकेसोबत खास संदेश
दिल्लीच्या रिसेप्शनच्या आमंत्रण पत्रिकाचा फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाला. आता मुंबईच्या रिसेप्शनची आमंत्रण पत्रिका लक्षवेधी ठरत आहे. कारण या पत्रिकेसोबत विरूष्काने एक खास संदेश दिला आहे.
दिग्दर्शक महेश भट्ट यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ही आमंत्रण पत्रिका पोस्ट करून विरूष्काला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. या पत्रिकेची खास गोष्ट म्हणजे या पत्रिकेसोबत एक रोपटे देण्यात आले आहे. हे रोपटे देवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश विराट आणि अनुष्काने दिला आहे.
श्रीलंका दौऱ्यादरम्यान विराट आणि अनुष्काने वृक्षारोपण केले होते.
मुंबईतील रिसेप्शनसाठी बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील अनेकांना आमंत्रित करण्यात आले आहे.